Thursday, May 30, 2024
Homeमुख्य बातम्या“मोदी खोटं बोलत होते, संपूर्ण लडाखला माहितीये की…”, चीनचा उल्लेख करत राहुल...

“मोदी खोटं बोलत होते, संपूर्ण लडाखला माहितीये की…”, चीनचा उल्लेख करत राहुल गांधींचं टीकास्र

दिल्ली | Delhi

चीनने नुकत्याच जाहीर केलेल्या अधिकृत नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन (Aksai Chin) चा वाटा दाखवल्याने भारतामध्ये नाराजी आहे. या प्रकरणावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी नुकताच आपला लडाख दौरा पूर्ण केला असून त्यानंतर आज सकाळी परत येताना विमानतळावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

“चीनने आपली जमीन हडपली हे संपूर्ण लडाखला माहितीय” असं म्हणत नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही, असं पंतप्रधान म्हणाले, ते खोटं आहे, हे मी अनेक वर्षांपासून म्हणत आहे. चीनने अतिक्रमण केलं आहे आणि हे संपूर्ण लडाखला माहीत आहे. नकाशाचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्यांनी जमीन हिसकावून घेतली आहे. यावर पंतप्रधानांनी काही तरी बोलायला हवं” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी चीननं जारी केलेल्या देशाच्या अधिकृत नकाशामध्ये लडाख आणि अरुणाचलमधील काही भाग, अक्साई चीन आपल्या देशात असल्याचं दाखवलं. तसेच, तैवान व वादग्रस्त दक्षिण चीनी समुद्राचा हिस्साही आपल्या देशाला जोडला. त्यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली असून चीनची ही कृती विचित्र असल्याची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाकडून मांडण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या