कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भारत आणि चीन वादाबद्दल एक व्हिडिओ ट्विटर वर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी मुक्तपणे आपले मत व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी अर्थव्यवस्था, शेजारी देशासोबत असलेले संबंध आणि परराष्ट्र धोरणावर बोलले आहे.
तसेच त्यांनी देशाचे संरक्षण, परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था यावर परखड मत व्यक्त केले आहे. परंतु गेल्या 6 वर्षात देश सर्व प्रकरणांमध्ये अपयशी ठरला आहे. अशी टीका त्यांनी केली आहे.
परराष्ट्र धोरणाविषयी बोलताना ते म्हणाले, यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपसह जवळजवळ प्रत्येक देशाशी आपले चांगले संबंध होते. परंतु आज हे नाते फक्त व्यवसायिक राहिले आहेत, रशियाशी संबंध बिघडू लागले आहेत. पूर्वी नेपाळ, भूतान, श्रीलंका हे आपले मित्र राष्ट्र होते. पाकिस्तान सोडून इतर सर्व शेजारी देश आपल्याबरोबर काम करत होते, पण आज प्रत्येक देश आपल्याविरूद्ध बोलत आहे. याच कारण काय ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.