Saturday, January 24, 2026
HomeनाशिकAccident News : चिराई घाटात भीषण अपघात; तीन ठार, एक गंभीर जखमी

Accident News : चिराई घाटात भीषण अपघात; तीन ठार, एक गंभीर जखमी

सुरगाणा|प्रतिनिधी|Surgana 

सुरगाणा (Surgana) तालुक्यातील चिराई घाटात (Chirai Ghat) मंगळवारी (दि. 3) रोजी दुपारी तीन वाजता (एमएच 15 एचई 1299) आणि (एम एच 15 एचडी 7103) या दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक (Accident) झाली. अपघातात भास्कर मोरे (22, रा. पंगारबारी, ता. सुरगाणा), मोहन लक्ष्मण पवार (रा. देवलदरी, ता. सुरगाणा) आणि रोहिदास सुभाष गवळी (रा. दरेगाव (ह) ता. कळवण) हे ठार झाले आहेत.

- Advertisement -

या अपघातात तीन जणांचा मृत्यू (Death) झाला असून, दिनेश मोढें (रा. पंगारबारी, ता. सुरगाणा) हा गंभीर जखमी (Injured) झाला आहे. जखमी व्यक्तीस तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) हलविण्यात आले आहे.

YouTube video player

सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे, मोहन पवार हे सुरगाणा कडून बोरगाव कडे येत असताना, तर भास्कर मोरे हे आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात झाला आहे. अपघात एवढा जोरदार होता की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य करत जखमीला 108 वाहनात टाकण्यासाठी मदत केली.

अपघाताचे (Accident) कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अतिवेग आणि घाटातील वळणदार रस्ता हे कारणीभूत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात (Surgana Police Station) गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दैनिक ‘देशदूत’ आयोजित आणि गंगापूर रोड व परिसरातील गृहप्रकल्पांवर आधारित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चा दुसरा दिवस नाशिककरांच्या गर्दीने आणि उत्साहाने...