Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाच्या ( BJP) महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ ( chitra Wagh )यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी वाघ यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उमा खापरे विधान परिषदेवर निवडून आल्याने महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपशी जोडल्या जातील, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते निर्णय राज्यातील महिलापर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ, असे वाघ यांनी यावेळी सांगितले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वाघ या ठाकरे सरकारच्या विरोधात आक्रमक होत्या. ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना विधान परिषदेवर जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र, त्याआधी पक्षाने त्यांच्यावर महिला आघाडीची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या