Monday, May 20, 2024
Homeजळगावचोपडा तालुक्यात विजांच्या कडकडाटसह परतीच्या पावसाने झोडपले

चोपडा तालुक्यात विजांच्या कडकडाटसह परतीच्या पावसाने झोडपले

चोपडा chopda प्रतिनिधी

शहरात व ग्रामीण भागात गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास प्रचंड विजांचा कडकडाटसह (great thunderbolt) परतीच्या पावसाने (return rain) तापी पट्ट्यासह (tapi belt) आदी गावांना अक्षरशः झोडपून (Literally swept away) काढले.यात वेचणीवर आलेला कापसासह ज्वारी,बाजरी,मका,सोयाबीन आदी पिकांची नासाडी होऊन सर्वच खरीप पिकांचे (kharif crops) अतोनात नुकसान (extreme damage) झाले आहे.

- Advertisement -

नैसर्गिक आपत्ती मुळे यंदाचा खरीप हंगाम पुर्णतः वाट लागली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीला मूग,उडीद गेले. ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने कहरच केल्याने शेतकऱ्यांच्या हातात कोणतेच पीक येणार नसल्याने खरीप पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दि.६ ऑक्टोबर रोजी गुरुवारी रात्री ११:३०
वाजेच्या सुमारास शहरासह चहार्डी, हातेड, भार्डू, वेले-आखतवाडे, गोरगावले, आडगाव, विरवाडे, मालापूर, धनवाडी, गरताड, वर्डी, मंगरूळ, अडावद, नागलवाडी, वैजापूर, चुंचाळे, चौगाव, लासुर, सत्रासेंन, गलंगी, भवाळे, गणपूर, घोडगाव, वेळोदे, कुसुंबे, विटनेर, मोहिदा, वढोदा, अजंटीसिम सह तापी पट्ट्यातील निमगव्हाण,तादंलवाळी, दोंदवाडे, घाडवेल, विचखेडा, धुपे, खाचणे, तावसे, कुरवेल, सनपुले, कठोरा, अनवर्दे, बुधगाव, मालखेडावाळकी आदी गावांना परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

एकतास चाललेल्या मुसळधार पावसात वेचणीवर आलेला कापूस, काढणीवर आलेली ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आदी पिकांची नासाडी झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी व ऑक्टोबर महिन्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामाची पुर्णतः वाट लागली असून,शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.

गेल्या पाच वर्षां पासून चोपडा तालुक्यात कधी कमी पाऊस तर कधी अतिवृष्टीमुळे दुष्काळी परिस्थिती आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.दरवर्षी येणाऱ्या संकटांना तोंड कसे द्यायचे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा असून,दैनंदिन संसाराचा गाडा कसा चालवायचा? या विवंचनेत शेतकरी आहे.यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्ष,शेतकरी कृती समिती,शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी केली आहे.
      

चोपडा तालुक्यात दि.६ ऑक्टोबर गुरुवारी मध्यरात्री नंतर झालेल्या पावसाची दि.७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मंडळ निहाय  शासकीय आकडेवारीची पुढील प्रमाणे

१) चोपडा-४० मि.मी.

२) अडावद-२९ मि.मी.
३) धानोरा-०७ मि.मी.

४) गोरगावले-३५ मि.मी.
५) चहार्डी-४० मि.मी.

६) हातेड-२० मि.मी.
७) लासूर-२५ मि.मी.

अशी नोंद करण्यात आली असून,सर्वात जास्त पाऊस चोपडा,चहार्डी, गोरगावले, अडावद, लासुर, हातेड मंडळात झाला आहे तर सर्वात कमी पावसाची नोंद धानोरा
मंडळात झाल्याची शासकीय नोंद आहे. यापूर्वी धानोरा मंडळात जास्त पाऊस झालेला आहे.
शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत चोपडा तालुक्यात एकूण ६९९.२७ मिलिमीटर पावसाची तहसील
कार्यालयाच्या दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या