Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमसिबिल सुधारण्याच्या नावाखाली 1.60 लाख व 13 तोळे सोने घेऊन फसवणूक

सिबिल सुधारण्याच्या नावाखाली 1.60 लाख व 13 तोळे सोने घेऊन फसवणूक

विरोध करणार्‍या महिलेस धमकी व छेडछाड || दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सिबिल क्लियर करून मोठे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने दोघा इसमांनी महिलेकडून एक लाख 60 हजार रुपये व 13 तोळे सोने घेतले. मात्र, पैसे परत न देता उडवाउडवीची उत्तरे देत होते. यावर महिलेने दिलेला चेक बाउन्स झाल्यानंतर त्या इसमांनी महिलेचा विनयभंग करून तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

फिर्यादी नगर-कल्याण रस्ता, छत्रपती शिवाजीनगर येथे राहतात. त्यांच्या पतीचे कापड दुकान आहे. त्यांची सिबिल खराब असल्याने त्यांच्या ओळखीचे बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) आणि धनंजय चौधरी (रा. जखणगाव, ता. नगर) यांनी सन 2023 मध्ये सिबिल सुधारून एक कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या पतीने वेळोवेळी एकूण एक लाख 60 हजार रुपये व 13 तोळे सोने त्यांच्याकडे दिले. मात्र, बराच काळ उलटूनही ना सिबिल सुधारले, ना कर्ज मिळाले. पैसे मागण्यासाठी वारंवार फोन केला असता टाळाटाळ सुरू होती.

या प्रकारानंतर बापू सोनवणे याने फिर्यादींना अ‍ॅक्सिस बँकेचा कोरा चेक दिला. त्यांनी तो बंधन बँकेत भरला असता तो बाउन्स झाला. यामुळे संतप्त झालेल्या सोनवणे व चौधरी यांनी 1 मार्च 2025 रोजी सकाळी नऊच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला रस्त्यात अडवले. त्यांनी फिर्यादीचा हात धरून ओढत तिचा विनयभंग केला व अश्लील भाषेत शिवीगाळ करत तू बाउन्स केलेला चेक परत दे, नाहीतर तुझ्या घरादाराची गय करत नाही, अशी धमकी दिली. यानंतर 3 मार्च 2025 रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास बापू सोनवणे व इतर तीन अनोळखी व्यक्तींनी चारचाकी वाहनातून फिर्यादींचा पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीला दोनदा कट मारून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे भीती वाटल्याने फिर्यादी काही वेळ मुलीच्या क्लासमध्ये थांबल्या. घरी परतल्यावर पतीला ही घटना सांगितली व अखेर मंगळवारी (4 मार्च) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव) आणि धनंजय चौधरी (रा. जखणगाव) यांच्याविरूध्द छेडछाड, फसवणूक, धमकी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...