Tuesday, August 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी CID ॲक्शन मोडमध्ये; VSR कंपनीच्या मालकासह, अधिकाऱ्यांची पुण्यात...

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी CID ॲक्शन मोडमध्ये; VSR कंपनीच्या मालकासह, अधिकाऱ्यांची पुण्यात चौकशी

पुणे | Pune
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गेल्या काही दिवसांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचंड संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूबाबत व्हीएसआर कंपनी आणि नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) काहीतरी माहिती दडवत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील एएआयबीचा विमान अपघात प्रकरणातील अहवाल समोर आल्यानंतर आता सीआयडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. पुणे सीआयडी कार्यालयात व्हीएसआर कंपनीचे मालक, अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

सीआयडीने ‘VSR व्हेंचर्स’ या विमान कंपनीची कसून चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात सीआयडीने कंपनीला एक सविस्तर प्रश्नावली पाठवली असून, संचालक रोहित सिंग यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची दाट शक्यता आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह आणि कंपनीचे कर्मचारी यांची सीआयडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. या चौकशीत सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून आर.के. सिंग यांना रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यावर आर.के. सिंग काय स्पष्टीकरण काय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -

‘मराठी बाणा’ फेम अशोक हांडेंवर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद, कार्यालयात घुसून बॅटने मारहाण

अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर आर.के. सिंह यांनी आपल्या कंपनीच्या विमानात कोणताही तांत्रिक बिघाड असल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यावेळी एकदाच प्रसारमाध्यमांसमोर आलेल्या आर.के. सिंह यांनी हे प्रकरण तापल्यानंतर नंतर या सगळ्याबाबत एक शब्दही बोलला नव्हता.

रोहित पवार यांनी काय आरोप केले?
व्हीएसआर कंपनी आणि केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावर रोहित पवार यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आला. या विमानामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधनाचा साठा करुन ठेवण्यात आला होता. एवढेच नव्हे तर वैमानिक सुमित कपूर याने मुद्दाम विमान जमिनीवर आदळून स्फोट घडवून आणला, असे आरोप रोहित पवार यांनी केले होते.

सीआयडीने या बाबींवर लक्ष केंद्रीत केले
सीआयडीने २८ जानेवारी रोजी झालेल्या विमानाचा प्रवास आणि त्याच्या बुकींग प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमानाचे भाडे किती होते, बुकींग कोणी केले, विमानाची तांत्रिक स्थिती काय होती आणि कंपनीची इतर कायदेशीर कागदपत्रे योग्य होती का, या सर्व बाबींचा तपास आता सीआयडी करणार आहे.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? अखेर सस्पेन्स संपला; कृषीमंत्री भरणेंनी थेट तारीखच सांगितली

विशेष म्हणजे, DGCA ने २४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या अहवालात व्हीएसआर कंपनीच्या कामकाजातील गंभीर दोष समोर आणले होते. या अहवालाचा आधार घेत आता सीआयडीने तपास अधिक तीव्र केला आहे.

प्रश्नांची सरबत्ती
अजित पवारांच्या प्रवासासाठी संबंधित विमानाची निवड कोणी केली? त्या दिवशी विमानासाठी वैमानिकाची नियुक्ती कोणी आणि कोणत्या निकषावर केली? विमानाचे नियमित मेंटेनन्स झाले होते का? अशा विविध मुद्यांवरील प्रश्नावली सीआयडीने व्हीएसआर कंपनीला पाठवली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...