Saturday, April 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'मराठी बाणा' फेम अशोक हांडेंवर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद, कार्यालयात घुसून बॅटने...

‘मराठी बाणा’ फेम अशोक हांडेंवर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद, कार्यालयात घुसून बॅटने मारहाण

मुंबई | Mumbai
‘मराठी बाणा’ सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जगभरात पोहोचली. याच जगप्रसिद्ध कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आणि लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक हांडे यांच्यासोबत भीषण घटना घडल्याची माहिती मिळतेय. अशोक हांडे यांना पार्किंगच्या मुद्द्यावरून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक हांडे यांना एका ५३ वर्षीय व्यक्तीने क्रिकेटच्या बॅटने मारल्याचे कळतेय. या हल्ल्यात अशोक हांडे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.

अशोक हांडे यांच्या मारहाण प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मारहाणीची घटना १ मार्च रोजी घडली. अशोक हांडे हे मुंबईतील माटुंगा पश्चिमेकडील मनमाला टँक रोडवरील युनायटेड हाऊसच्या तळ मजल्यावरच्या कार्यालयात बसले होते. याच परिसरात राहणारा आरोपी प्रथमेश पांडुरंग उनफोडे उर्फ बंटी हा त्यांच्या कार्यालयात बॅट घेऊन आला. सर्वात आधी त्याने बॅटने कार्यालयाच्या काचेवर हल्ला केला. त्यानंतर आवाज ऐकून अशोक हांडे कार्यालयाबाहेर आले.

- Advertisement -

NCP News: राष्ट्रवादीचे २० आमदार रात्री अचानक देवगिरीवर; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबत काय झाली चर्चा?

हप्ता दिल्याशिवाय कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही, अशी धमकी हल्लेखोराने दिली होती. हांडे यांना तो व्यक्ती शिवीगाळ करत होता. हांडे यांच्यावर बॅटनेही हल्लाही केली. कार्यलायतील एका व्यक्तीने बॅट हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याने पुन्हा बॅटने मारले. तो इतक्यावरच थांबला नाही त्याने पुन्हा इमारतीबाहेर हांडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच कार्यलायतील एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांनी याबाबत माहित दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या, गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हासुद्धा हल्लेखोराने त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर हल्लोखोराने पोलिसांसमोरही काही अपशब्द वापरले. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याच्याविरोधात मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक हांडे यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशोक हांडे हे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि लोककलेचे अभ्यासक आहेत. मराठी बाणा या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार – महसूल मंत्री...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच होण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करत...