Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्यासिटीलिंक बस सेवकांचा संप मिटला

सिटीलिंक बस सेवकांचा संप मिटला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

वेतन अभावी वाहकांनी पुकारलेला सिटिलिंक बस सेवा संप बुधवारी सायंकाळी मिटला. प्रभारी मनपा आयुक्त बानायत यांनी कंपनी प्रतिनिधी व ठेकेदार यांची बैठक घेउन दोन दिवसांत मागील दोन महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्याचे आदेश दिले. ठेकेदाराने आदेश मान्य करून 21 जुलै पर्यंत पगार देणार असे आश्वासन दिले. दुपारनंतर बस सेवा सुरू होणार होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने सेवा सुरू होणार आहे.

दीड दिवसात संप मिटल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे सिटीलिंक कंपनीने तिकीट वसुलीसाठी मॅक्स डिटेक्टीव्ह अॅन्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनीची नियुक्ती केलेली आहे.पण कंपनीने वाहकांचे मागील दोन महिन्यांचे वेतन अदा केले नव्हते. शिवाय पीएफ व बोनस देखील अदा केला जात नव्हता. आपल्या हक्काचा मागण्यांसाठी वाहकांनी मंगळवारी अचानक संप पुकारल्याने शहराची लाईफलाईन असलेली बससेवा ठप्प झाली होती.

अडीचशे बसेस पंचवटी व नाशिकरोड डेपोत उभ्या होत्या. संपाचा सर्वाधिक फटका चाकरमान्यांसह विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला. कर्मचा- यांच्या मुख्य मागण्यांमध्ये प्रलंबीत वेतन मिळणे, दंडात्मक कार्यवाहीबाबत फेरविचार करणे आदीचा समावेश होता. बुधवारी संपाबाबत तोडगा काढणेसाठी प्रभारी आयुक्त बानायत य‍ांनी सिटीलिंक प्रशासन, मॅक्स डिटेक्टीव्ह अॅन्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनीचे प्रतिनिधी, ठेकेदार व संप पुकारलेल्या वाहक कर्मचा-यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत वाहकांचे प्रलंबीत असलेले वेतन मॅक्स डिटेक्टीव्ह अॅन्ड सिक्युरीटी सर्व्हिसेस कंपनीने शुक्रवारपर्यंत (दि.२१) अदा करणेबाबत निर्देश दिले. तसेच वाहकांना लागलेला उशीरा गेलेल्या फे-यांच्या दंडाबाबत फेरतपासणी करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. त्यानंतर वाहकांनी संप मागे घेतला. दंडाच्या रक्कमेची होणार फेरतपासणी वाहकांकडून घडलेल्या चुकांसाठी ठेकेदाराला लावण्यात आलेल्या दंडामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. हा दंड १ कोटी ६८ लाख ५२ हजार ११८ रुपये इतका असून, तो नियमबाह्य असल्याचा आरोप ठेकेदाराकडून केला जात आहे. दंड कमी करा, अशी ठेकेदाराची प्रमुख मागणी असून बैठकित त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी दंडाची फेरतपासणी केली जाईल असे आश्वासन मनपाकडून देण्यात आले.

प्रवाशांचे हाल

मागील दोन दिवसापासून शहर बस सेवा बंद पडली होती, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी तसेच कामावर जाणाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. तर काही प्रमाणात रिक्षा चालकांनी भाडे वाढ करून प्रवाशांना एक प्रकारे लुटण्याचा प्रकार केल्याचे देखील समोर आले.

पालकमंत्री भुसेंची शिष्टाई यशस्वी

नाशिक शहराची वाहतूक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने नाशिककरांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले, हे लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका आयुक्त, संबंधित ठेकेदार, तसेच आंदोलकांच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरून चर्चा करून मध्यस्थी करत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आंदोलकांनी देखील पालकमंत्री भुसे यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून मार्ग काढत आंदोलन मागे घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या