मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे (Malegaon Youth Association) सिनेमॅक्स (Cinemax) समोरील रस्त्याच्या कामासाठी आज पुन्हा चक्री उपोषण करण्यात आले. आंदोलनाची (agitation) दखल न घेतल्यास आमरण उपोषण किंवा आत्मदहन आंदोलन (Self-immolation agitation) करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
सिनेमॅक्स समोरील रस्त्याचे काम नित्कृष्ठ दर्जाचे होत असतांना स्थानिक नागरिकांसह संघटनेने तक्रार केली होती. तथापि प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे रस्ता महिनाभरातच उखडला. याबाबत वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर लेखी आश्वासन देऊन देखील या रस्त्याचे काम महापालिकेतर्फे (Municipal Corporation) केले जात नसल्याचे देवा पाटील यांनी नमूद केले तर सामाजिक कार्यकर्त्यांना कामाचे श्रेय मिळण्याच्या भीतीने राजकीय पुढारी हे काम होऊ देत नाहीत.
जनतेला वेठीस धरण्याचे काम नेते व अधिकारी करीत आहेत, असा आरोप निखिल पवार यांनी केला. यावेळी मोनाली पाटील, शेखर पगार, पुरुषोत्तम काबरा, सुशांत कुलकर्णी, तुषार पाटील, मनोज पाटील, भरत पाटील, दिनेश पाटील, प्रदीप पहाडे, प्रवीण चौधरी, वैभव सोनवणे, प्रमोद भावसार, करण भोसले, केतन विसपुते, सुनील घोडके, राजेंद्र पाटील, संध्या पाटील, प्रीती घोडके, तनुजा अहिरे, हिना शाह, दगडूलाल बाफना, सुरेश शर्मा, दिनेश गवळी, विनोद पवार, रामा देवरे, भूपाल भोसले, कपिल डांगचे, गणेश जंगम, महेश शर्मा, रमेश जैन, प्रमिला अग्रवाल, संदीप दशपुते, प्रदीप पिंगळे आदी उपस्थित होते.