Sunday, November 24, 2024
Homeदेश विदेशनागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक प्रचंड विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. विधेयकाच्या बाजूने 117 मते पडली तर विधेयकाविरोधात 92 मते पडली.

लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणार्‍या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग करून आपला विरोध दर्शविला आहे. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

मात्र अनुच्छेद 370 नंतर एक महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने राज्यसभेत मान्य केला आहे. भाजपाचा हा एक महत्त्वाचा संकल्प होता जो पूर्ण झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आज दुपारी 12 वाजता हे विधेयक मांडलं. या विधेयकावर 6 तासाहून अधिक वेळ चर्चा केल्यानंतर रात्री 8 नंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यासाठी मतदान घेण्यात आले आणि बहुमताने राज्यसभेने ही मागणी फेटाळून लावली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या