नाशिक | प्रतिनिधी
भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीआयटीयु) कडून आज नाशिक जिल्ह्याच्या कामगार चळवळीवर पोलिसांची दडपशाही भूमिका आणि सीआयटीयुचे जिल्हा सरचिटणीस कॉन्म्रेड देवेदास आडोळे यांना नुक्तीची दिलेली तडीपारीची नोटीस. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी आज सीआयटीयुकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
यावेळी कामगार युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, कॉ. सीताराम ठोंबरे, कॉ देविदास आडोळे यांची यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
फब कंपनीतील कामगारांना अमानुष मारहाण करणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी तसेच कंपनीतील कामगारांवरील खोटे गुन्हा मागे घ्या अशी मागणी एका पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासोबतच कॉ देविदास आडोळे यांना पाठविलेली तडीपारीची नोटीस मागे घ्या.डायनामिक प्रेस्टेस कंपनीतील कामगाराचे अपहारण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करा,
कंपनी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या मालकाविरुद्ध कडक कारवाई करा
कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय औद्योगिक शांतता समन्वय समितीचे कामगाज पुन्हा सुरु करून विवाद असलेल्या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.