Friday, May 3, 2024
HomeनाशिकPhotoGallery : नाताळसाठी नाशिकची बाजारपेठ सजली

PhotoGallery : नाताळसाठी नाशिकची बाजारपेठ सजली

नाशिक | Nashik

सर्वत्र नाताळाची तयारी सुरू झाली असून, बाजारात सांताक्‍लॉज आणि चॉकलेटचे केक उपलब्ध झाले आहेत. तसेच ख्रिसमस ट्री, स्टार, बेल, मास्क, कपडे, टोप्या, आदी वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

- Advertisement -

प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचे नियोजन करण्यात गुंतला आहे. दुकानदारांकडून सांताक्‍लॉजच्या माध्यमातून चिमुकल्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सगळ्यांनाच नाताळचे आकर्षण असते. आंनदाने नाचून-गाऊन साजरा करण्याचा हा सण. केक यातला महत्त्वाचा भाग असतो. चॉकलेट म्हटले की लहान मुलांची आठवण येते. त्याचबरोबर नाताळचे महत्त्व असणारा सांताक्‍लॉजचाही केकमध्ये समावेश झालेला आहे.

या दिवसांत प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांताक्‍लॉज दिसून येतो. विविध रंगांनी, डिझाईन केलेले केक बनवण्यात येतात. यात सांताची अनेक रूपे पाहायला मिळतात. काही केकविक्रेत्यांकडे नाताळासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच बाजारात सांताच्या टोप्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून, घराच्या रोषणाईस विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सजावटीच्या माळा, रोषणाई करणारे दिवे, मेरी ख्रिसमस स्टिकरही खरेदी केले जात आहेत.

तसेच चॉकलेटच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. दुकानांमध्ये विविध स्वादांच्या विविध रंगरूपांतील चॉकलेटने खरेदीदारांना भुरळ घातली आहे. विविध आकाराच्या खोक्‍यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात बांधून हे चॉकलेट दिले जात आहेत.

सांताच्या विविध वस्तू

टोपी, क्रिप सेट, बेल्स, वुलन, मास्क, ट्री, स्टार, ड्रेस, कँडल.

- Advertisment -

ताज्या बातम्या