Sunday, October 11, 2026
Homeदेश विदेशCJP Protest : "नरेंद्र मोदी डरपोक पंतप्रधान, त्यांनी ज्ञानेश कुमारांना..."; सीजेपीच्या रांका,...

CJP Protest : “नरेंद्र मोदी डरपोक पंतप्रधान, त्यांनी ज्ञानेश कुमारांना…”; सीजेपीच्या रांका, दास यांचा जोरदार हल्लाबोल

नवी दिल्ली | New Delhi

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) दिल्लीतील जंतरमंतर आंदोलन करण्याची हाक शनिवारी (दि.१० ऑक्टोबर) रोजी देण्यात आली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यासह त्यांचे सहकारी सौरव दास (Sourav Das) आणि आशुतोष रांका (Ashutosh Ranka) यांना इंदिरा गांधी विमानतळावरून विमानातूनच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

त्यानंतर आज (रविवारी) या तिघांची सुटका करण्यात आली. यावेळी सुटका झाल्यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास (Ashutosh Ranka and Saurabh Das) यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. तर अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) हे आजीच्या निधनामुळे कुटुंबाच्या भेटीसाठी हिंगोलीला गेल्याने ते पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते.

नरेंद्र मोदींसारखा डरपोक पतंप्रधान पाहिला नाही

यावेळी रांका म्हणाले की,”आतापर्यंत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखा डरपोक पतंप्रधान भारतात पाहिला नाही. मागील दोन दिवसांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारताची जगभरात बदनामी झाली असून, याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मागील ७२ तासांत हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. जे कार्यकर्ते आंदोलन करणार होते त्यांना मारहाण करण्यात आली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचविण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी परिस्थिती बिघडून टाकली आहे.नरेंद्र मोदी देशातील सर्वात महान पंतप्रधान होऊ पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

ज्ञानेश कुमारांविरोधातील लढाई मोदींनी स्वत:कडे वळवून घेतली

पुढे ते म्हणाले, “आमच्या आई-वडिलांकडून आणीबाणीची कहाणी ऐकली होती मात्र काल आम्ही ती प्रत्यक्षात अनुभवली.मागील७२ तासांतील परिस्थितीवरून भयंकर परिणाम दिसले. १९७५ साली ट्रेन बंद करण्यात आले नव्हते. काल अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. लाखोंच्या संख्येने लोकांना त्रास देण्यात आला. निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात असलेली लढाई नरेंद्र मोदी यांनी स्वत:कडे वळवून घेतली आहे.राजाचा जीव पोपटात असून, आयोगाची जबाबदारी लोकशाही वाचविण्याची आहे. परंतु ज्ञानेश कुमार यांनी मोदींसाठी आणि भाजपला जिंकवण्यासाठी काम केले असल्याने सरकार त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत”, असेही आशुतोष रांका यांनी म्हटले.

आमच्या वकिलांशी बोलू दिले नाही.

सौरभ दास म्हणाले की,गेल्या तीन दिवसात देशात जे काय झालं ते एखाद्या अघोषित आणीबाणी सारखे आहे. काल दिल्ली पोलीसांनी आम्हाला ताब्यात घेतल्यानंतर आमच्या वकिलांशी बोलू दिले नाही. आमचे फोन जमा करून घेतले आणि त्यांनी ते हॅक केले असावेत अशी आम्हाला शंका आहे. ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी हे सर्व काही होत असून, भारत सरकार सध्या आपल्याच देशातील नागरिकांविरोधात युद्ध करत आहे, असे त्यांनी म्हटले.

ताब्यात घेतलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली

तर कॉकरोच जनता पार्टीच्या लीगल अफेअर्स हेड रत्ना सिंह यांनी सांगितले की, “आम्हाला ताब्यात घेताना कोणतेही कारण देण्यात आले नाही. जेव्हा पोलिसांनी विचारले की मला ताब्यात घेण्याचे कारण काय तर त्यावर त्यांनी उत्तर दिले की आम्हाला वरून आदेश आहेत. ताब्यात घेतलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर, निधनाचं खरं कारण उलगडलं, काय झालेलं?

0
पुणे | Pune भारतीय चित्रपटसृष्टीला आपल्या अफाट अभिनय कौशल्याने आणि भारदस्त आवाजाने समृद्ध करणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली...