Monday, October 12, 2026
Homeमहाराष्ट्रनाना पाटेकरांचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर, निधनाचं खरं कारण उलगडलं, काय झालेलं?

नाना पाटेकरांचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर, निधनाचं खरं कारण उलगडलं, काय झालेलं?

पुणे | Pune

भारतीय चित्रपटसृष्टीला आपल्या अफाट अभिनय कौशल्याने आणि भारदस्त आवाजाने समृद्ध करणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गोव्यातील बांबोलिम येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा शवविच्छेदन अहवाल (Autopsy Report) अधिकृतपणे रुग्णालयर प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालामधून अभिनेत्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले असून, वैद्यकीय अहवालानुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

वैद्यकीय अहवालानुसार, ७६ वर्षीय नाना पाटेकर यांना ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’ (CAD) हा आजार होता. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीमध्ये रक्ताची गुठळी (Blood Clot) तयार झाल्यामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. या गुठळीमुळे हृदयाच्या एका मोठ्या भागाचा रक्तपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे त्यांना तीव्र ‘कार्डियाक अरेस्ट’चा सामना करावा लागला. दरम्यान, प्रमाणित कार्यपद्धतीनुसार गोवा पोलिसांनी या प्रकरणी ‘अनैसर्गिक मृत्यू’ (Accidental Death) म्हणून नोंद केली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासाच्या माहितीनुसार, गोव्यातील डोना पॉला येथील निवासस्थानी मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांना अस्वस्थता आणि वेदना जाणवू लागल्या होत्या. या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला, अमेय नाईक यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून कल्पना दिली होती आणि फोनही केला होता. परंतु मध्यरात्र असल्यामुळे तो मेसेज अमेय यांना वेळेवर पाहता आला नाही. पहाटे साडेतीनच्या सुमारास जेव्हा अमेय यांनी तो मेसेज पाहिला, तेव्हा त्यांनी तातडीने डोना पॉला येथील निवासस्थानी धाव घेतली. तिथे नाना पाटेकर सोफ्यावर बेशुद्ध आणि घामाघूम अवस्थेत आढळले.

तत्काळ सुरक्षा रक्षकाच्या मदतीने आणि मणिपाल रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवेच्या साहाय्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मणिपाल रुग्णालयाचे डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करत ‘कार्डियाक मसाज’ देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

गुरुवारी दुपारी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्याहून थेट पुण्यातील त्यांच्या फार्म हाऊसवर आणण्यात आले. तिथे रात्री उशिरा शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने अंत्यविधी पार पाडले. एका दिग्गज अभिनेत्याचा असा अकाली आणि नाट्यमय अंत झाल्याने संपूर्ण कलाविश्वातून आणि राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Simhastha News : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला गती –...

0
नाशिक | Nashik आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामे, गोदाघाट परिसरातील सुविधा, रामतीर्थ व कुशावर्त तीर्थ येथील कामे, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था...