Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Igatpuri News : जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; गुन्हा दाखल

Nashik Igatpuri News : जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; गुन्हा दाखल

इगतपुरी । प्रतिनिधी | Igatpuri

तालुक्यातील भावली (Bhavali) येथील धामडकीवाडी येथे दोन गटात जमिनीच्या वादातून तुफान हाणामारी (Clash ) झाल्याची घटना घडली असून या घटनेत गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पोलीसांनी (Police) १० ते १२ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, भावली येथे फिर्यादी व साक्षीदार यांनी कायदेशिर रित्या विकत घेतलेल्या जमिनी या धाकदपटशा दाखवून फसवणूक करुन बळकावल्या आहेत. या कारणावरुन हा वाद झाला असल्याची माहिती पोलीसांनी दिली. तर घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत प्रशांत कडू (वय ४०) राहणार नांदगाव सदो यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात (Igatpuri Police Station) फिर्याद दिली आहे.

Devendra Fadnavis : ड्रग्ज प्रकरणी कठोर कारवाई करणार – फडणवीस

या फिर्यादीत म्हटले आहे की, मुंबई येथील दिपक सपके हा स्व:ताला समाजसेवक आहे असे आदिवासी लोकांना सांगून त्यांना चिथावणी देऊन फिर्यादी व साक्षीदार यांनी कायदेशिर रित्या विकत घेतलेल्या जमिनी या धाकदपटशा दाखवून फसवणूक करुन बळकावल्या आहेत. त्या परत मिळवून देतो असे सांगून त्या बदल्यात खंडणी मागणी केली होती. दिपक सपके याने त्यातील ११ लाख रुपये स्वीकारले असून उर्वरीत खंडणीची रक्कम देण्यास फिर्यादीला जमले नसल्याने खंडणीची मागणी करण्याकरीता दिपक सपके व नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांनी वारंवार फेसबुक व इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन फिर्यादीची बदनामी केली. तसेच खंडणी देण्याकरीता मानसिक दबाव आणून फिर्यादी व त्याचे कुटूंबास जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

तर शुक्रवार (दि. ०३ नोव्हेंबर) रोजी दिपक सपके याने सायंकाळी गैरकायद्याची मंडळी जमवून साथीदारासह धामडकी वाडी येथे येवून भावली परीसरातील अदिवासी शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना चिथावणी दिली. त्यामुळे आदिवासी शेतकरी यांनी फिर्यादी आणि त्याचे सहकारी तसेच तेथे असलेल्या नागरिकांना शिवीगाळ करून दगडफेक करत फिर्यादीला व त्याचे सहकारी यांना त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांना जखमी केले. तसेच फिर्यादी व साक्षीदारांच्या खाजगी वाहनाचे नुकसान केले.

Maratha Reservation : राज्य सरकारकडून मनोज जरांगेंची ‘ही’ पहिली मागणी पूर्ण; जीआर केला सुपूर्द

दरम्यान, याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात दीपक सपके, नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा रा. मुंबई, अजय पासी, बेबीताई तेलम, उल्हास देवराम तेलम, विलास सोमा आगविले, संतु देवराम तेलम रा. धामडकी वाडी व भावली यांच्यासह १० ते १२ जणांवर भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक सुनिल भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे करत असून धामडकीवाडी व भावली येथे दहशतीचे वातावरण असल्यामुळे सीआरपीएफच्या (CRPF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश

- Advertisment -

ताज्या बातम्या