Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमनाशिक शहरात बंददरम्यान दोन गट आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात

नाशिक शहरात बंददरम्यान दोन गट आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात

नाशिक | प्रतिनिधी
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजाकडून शहराच्या विविध भागात बंद पाळण्यात आला आहे. यावेळी शहराच्या भद्रकाली परीसरात दोन गटात वाद झाला होता मात्र पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

- Advertisement -

बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हाक देण्यात आली. शहरातील एमजी रोड, मेन रोड, पंचवटी, नविन नाशिक, नाशिक रोड, सातपूरसह इतर भागात बंद पाळण्यात आला.

दरम्यान, नाशिक बंदची हाक असताना एका गटाकडून काढण्यात आलेल्या रॅलीतून दुसऱ्या गटात वाद झाला. त्यातून दूध बाजार व पिंपळचौक येथे तणाव निर्माण झाला. मात्र, शहर पोलिसांनी तत्काळ नियंत्रण मिळवत जमावास पांगविले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संपूर्ण शहर पोलिस दल भद्रकाली व जुने नाशिक भागात कार्यरत झाले आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव वेळीच निवळला असून नाशिककरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या