Tuesday, March 25, 2025
Homeनगरसफाई कर्मचार्‍यांचे आजपासून काम बंद !

सफाई कर्मचार्‍यांचे आजपासून काम बंद !

सातव्या वेतनसाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी सुरू केलेले उपोषण काल, गुरूवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते. आज (शुक्रवार) साफसफाई कर्मचारी काम बंद आंदोलन करून पाठिंबा देणार असून राज्य सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास रात्री स्ट्रीट लाईट बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नगरकरांनी महापालिका कर्मचार्‍यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचे आवाहन कर्मचार्‍यांची केले आहे.

- Advertisement -

नगर मनपा कर्मचारी, अधिकारी नगरकरांना जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतात. संकट काळामध्ये सर्वात आधी मनपा कर्मचारी धावून येतात. तरी देखील मनपा कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित आहे. राज्य सरकार या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनपा कर्मचार्‍यांनी यावेळी केला. चौथ्या दिवशी साफसफाई कर्मचारी आपले सफाईचे काम उरकून उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, उद्या (शुक्रवार) पहाटेपासून शहरातील स्वच्छता बंद ठेवणार आहे, जर सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास शहरातील रात्रीचे पथदिवे देखील बंद ठेवले जाईल. महापालिका कर्मचारी व नगरकर यांचे कामाच्या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण झाले असून नगरकरांनी देखील कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही कर्मचार्‍यांनी यावेळी केली.

मनपा कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, बाबासाहेब राशिनकर आणि जितेंद्र सारसर उपोषणाला बसले असून सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास अन्न त्यागाबरोबरच पाण्याचा देखील त्याग केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, आर. जी. सातपुते, अस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, कामगार युनियनचे सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे आदींसह कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचा पाठिंबा
नगर शहर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मनपा कर्मचार्‍यांना पाठींबा देण्यात आला. पाठींब्याचे पत्र शिवसेना पदाधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देवुन दिले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, अनिल बोरूडे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. तसेच शिवसेना पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेवुन त्यांनी तातडीने कर्मचार्‍यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...