Saturday, July 27, 2024
Homeनाशिकगणपती विसर्जनस्थळी सामूहिक रित्या नियोजन करावे - मंत्री भुजबळ

गणपती विसर्जनस्थळी सामूहिक रित्या नियोजन करावे – मंत्री भुजबळ

येवला| श.प्रतिनिधी

गणेश उत्सव कार्यकाळात संपूर्ण शहरात स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच विसर्जनस्थळी पोलीस प्रशासन व नगरपालिका यांच्याकडून सामूहिक रित्या चोख नियोजन करण्यात यावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

- Advertisement -

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, नायब तहसीलदार पंकजा मगर, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहर व परिसरात गणेश उत्सवाच्या कार्यकाळात संपूर्ण शहर स्वच्छ ठेवावे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करण्यात यावे. दीड दिवस, पाच दिवस व दहा दिवसांच्या गणेश विसर्जन सोहळ्याच्या दिवशी घाट स्थळी स्वच्छता ठेवण्यात यावी तसेच यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने सामूहिक रित्या नियोजन करण्यात यावे.

घाट स्थळी साऊंड सिस्टीमची व्यवस्था करून स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची टीम तैनात ठेवावी. तसेच शहरात निघणाऱ्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांचे नियोजन करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशा सूचना त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या