Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: जयंत पाटलांना महायुतीत घेणार का?CM फडणवीसांनी एका शब्दात दिलं उत्तर

Devendra Fadnavis: जयंत पाटलांना महायुतीत घेणार का?CM फडणवीसांनी एका शब्दात दिलं उत्तर

मुंबई | Mumbai
राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात भाकरी फिरली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात येणार आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता जयंत पाटील महायुतीत जाणार का? अशी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर एका शब्दात उत्तर दिले आहे.

सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात येणार आहे. राजीनाम्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट नसले तरी, यामागे काही राजकीय समीकरणे असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती. ही जबाबदारी नव्या तरुण चेहऱ्याकडे द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे सांभाळणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, “तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, ज्यांनी राजीनामा दिला त्यांना शुभेच्छा आणि जे नवीन होणार आहेत त्यांनाही शुभेच्छा. सर्वांनी चांगले काम करावे,”असे ते म्हणाले. यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील महायुतीत येणार आहेत का? अस विचारले असता त्यांनी एका शब्दात ‘नाही’ म्हणून सांगितले.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...