Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Winter Session: "हातावरील लिहिलेले हस्ताक्षर तिचेच"; महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिली...

Maharashtra Winter Session: “हातावरील लिहिलेले हस्ताक्षर तिचेच”; महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

नागपूर | Nagpur
फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले. महिला डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती. महिला डॉक्टरने २३ ऑक्टोबर रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. हातावर लिहिलेल्या एका सुसाईड नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहिली होती. या प्रकरणात अटकेत असलेल्या पीएसआय बदनेने तरुणीचे शोषण केल्याचेही त्याच्या चॅट्समधून स्पष्ट झाले असल्याचे फडणवीसांनी विधानसभेत सांगितले.

हातावर लिहिलेले हस्ताक्षर तिचेच
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. त्यातून समाजात दुःखाची लाट तयार झाली. याचा तपास करण्यासाठी एसआयटी समिती नेमली आहे. त्याचबरोबर न्यायालयीन चौकशीसाठी आयोगही नेमण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) जो अहवाल आला आहे, त्यात डॉक्टर महिलेने हातावर जे लिहिलेले आहे, ते तिचेच हस्ताक्षर आहे.”असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

पोलीस अधिकाऱ्यानेच तिची फसवणूक आणि शारिरीक शोषण केल्याचे दिसत आहे
“या प्रकरणात पोलीस अधिकारी बदने यांनी तिची फसवणूक आणि शारिरीक शोषण केल्याचे दिसत आहे. लग्नाचे आमिष दाखवल्याचे लक्षात येते. नंतर मात्र बदनेंनी वेगळी भूमिका घेतली,” असेही त्यांनी सांगितले.

YouTube video player

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “आरोपीला अटक झाल्यानंतर तो अटकेसाठी फिट आहे की नाही यासंदर्भातील रिपोर्ट घ्यावा लागतो. सदर महिला डॉक्टरने कोही रिपोर्ट अनफिट दिल्याने पोलिसांनी एक मोठे पत्र वरिष्ठांना लिहिले. हे मोठे गुन्हेगार असून, त्यांना अनफिटचे प्रमाणपत्र दिले जात आहे अशी तक्रार त्यांनी केली. यानंतर चौकशी झाली आणि तिने ही पत्र लिहिले. पण हे सगळे ५ महिन्यापूर्वीचे आहे”.

दुसऱ्या आरोपीने एकप्रकारे फसवणूक केलेली आहे
दरम्यान, दुसऱ्या आरोपीने देखील शोषण केलं होते. त्यामुळे डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, असे फडणवीस म्हणाले. या प्रकरणात दुसरा कोणताही अँगल नाही तिने आत्महत्याच केली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पीडित कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

फॉरेन्सिक पुरावे जमा केले
या प्रकरणात जेवढी नावे घेण्यात आली तेवढ्या सगळ्यांची चौकशी करण्यात आली आहे. काही लोकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीच राजकारण चालत नाही. या प्रकरणात पारदर्शी पद्धतीने चौकशी झाली. कुणालाही सोडले गेले नाही. सर्वांची चौकशी होईल. पोलिसांकडे महिलेचे हॉटेलवर जाईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही आहेत. फॉरेन्सिक पुरावे जमा केले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

ममता

SIR: “निवडणूक आयोग हे व्हॉट्सॲप आयोगासारखे, फक्त नावे हटवण्यासाठी…”, ममता बॅनर्जींचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) खटल्याची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. या खटल्यावरून राजकीय...