मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा नागरिकांच्या कुटुंबियांना मदत (Help) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच इतरही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत झाले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबियांच्या (Families) शिक्षण, रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार असून,या हल्ल्यात मृत्यू (Death) झालेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत फडणवीसांनी घेतला आहे.