मुंबई | Mumbai
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने गुंतवणुकीचा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पहिल्याच दिवशी विविध जागतिक आणि भारतीय कंपन्यांसोबत तब्बल १४.५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रात साधारण १५ लाख नवीन रोजगार निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि स्मार्ट सिटी क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असल्याने राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठा वेग मिळणार आहे.
मुंबईसाठी डिजीटल ट्वीन प्रोजेक्ट केला जाणार आहे. यानुसार लंडनच्या अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्हसोबत मिळून मुंबईचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल, ज्यामुळे शहराचे नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सोपे होईल. त्यासोबतच जर्मनीच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकसोबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी करार करण्यात आला आहे. तसेच सिंगापूरच्या सेम्बकॉर्प डेव्हलपमेंट कंपनीसोबत कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या औद्योगिक उद्यानांसाठी तंत्रज्ञान भागीदारी केली आहे.
महाराष्ट्रात ३५ लाख रोजगार निर्माण होणार
दरम्यान, जागतिक स्तरावर महाराष्ट्राची विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात सध्या ‘तिसरी मुंबई’ आकार घेत असून, या परिसरासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सुमारे 10 ते 12 विविध क्षेत्रांतील उद्योगांशी सध्या समन्वय साधला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत.
या क्लस्टरमुळे सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील, असा महत्त्वपूर्ण अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी राज्याकडे उत्कृष्ट ‘मेन्यू कार्ड’ तयार असल्याचे त्यांनी मिश्किलपणे नमूद केले.
मोठी बातमी! कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू
या कंपन्यांसोबत करण्यात आले करार
- सुमितोमो रिअॅल्टी अँड डेव्हलपमेंट
गुंतवणूक: 8 अब्ज डॉलर | रोजगार: 80,000
- के. राहेजा कॉर्प
गुंतवणूक: 10 अब्ज डॉलर | रोजगार: 1,00,000
- अल्टा कॅपिटल / पंचशील रिअॅल्टी
गुंतवणूक: 25 अब्ज डॉलर | रोजगार: 2,50,000
- IISM ग्लोबल
गुंतवणूक: 8 अब्ज डॉलर | रोजगार: 80,000
- JICA – धोरणात्मक भागीदार
- सेम्बकॉर्प डेव्हलपमेंट (सिंगापूर) – कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या औद्योगिक उद्यानांसाठी ज्ञान भागीदार
- टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक (जर्मनी) – शाश्वत शहरी वाहतूक प्रणालीसाठी सहकार्य
- अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह (लंडन) – मुंबईसाठी ‘डिजिटल ट्विन’ इकोसिस्टम विकसित करण्याचा उपक्रम
देशांतर्गत गुंतवणुकीलाही गती
दावोसमध्ये राज्य सरकारने भारतीय कंपन्यांसोबतही महत्त्वाचे करार केले आहेत.
- लोढा डेव्हलपर्स लिमिटेड
गुंतवणूक: ₹१,००,००० कोटी | रोजगार: 1,50,000
क्षेत्र: IT / ITES – डेटा सेंटर्स | प्रदेश: MMR - योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.
गुंतवणूक: ₹४,००० कोटी | रोजगार: 6,000
क्षेत्र: नवीकरणीय ऊर्जा | प्रदेश: पालघर / MMR - BFN फोर्जिंग्स
गुंतवणूक: ₹565 कोटी | रोजगार: 847
क्षेत्र: पोलाद | प्रदेश: पालघर / MMR - सुरजागड इस्पात लिमिटेड
गुंतवणूक: ₹२०,००० कोटी | रोजगार: 8,000
क्षेत्र: पोलाद | प्रदेश: गडचिरोली / विदर्भ - SBG ग्रुप (MMRDA)
गुंतवणूक: $20 अब्ज | रोजगार: 4,50,000
क्षेत्र: लॉजिस्टिक्स | प्रदेश: मुंबई महानगर प्रदेश




