Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis: “इंग्रजांनी व काही स्वकीयांनीही आमच्या इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला";...

Devendra Fadnavis: “इंग्रजांनी व काही स्वकीयांनीही आमच्या इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला”; फडणवीसांनी व्यक्त केली खंत

पुणे | Pune
पुण्यातील एनडीए येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज पार पडलं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थोरल्या बाजीरावांच्या रणनितीबाबत आणि युध्दाच्या संदर्भात भाष्य केले.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत अपुराच पोहचण्यासाठी इंग्रज व काही स्वकीयांना दोष दिला. त्यामुळे मोगलांनंतर आपल्याकडे थेट इंग्रजच आले, असे आपल्याला वाटले, असेही फडणवीस यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी त्यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या युद्धनीतीचे काही दाखले दिले.

- Advertisement -

काय म्हणाले फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, थोरल्या बाजीराव पेशव्यांसाठी वेग ही सर्वात मोठी रणनीती होती, “थोरले बाजीराव पेशवे यांच्या लढाईत वेग ही सर्वात मोठी रणनीती असायची. जेव्हा मुघल साम्राज्याची सेना एका दिवसात आठ ते दहा किलोमीटर प्रवास करायची, तेव्हा थोरल्या बाजीरावांनी अशी सेना तयार केली होती की जी एका दिवसात ६० ते ८० किलोमीटर प्रवास करू शकायची. त्यांचे हे युद्ध कौशल्य होते”, असे फडणवीस म्हणाले.

YouTube video player

४१ लढाया एकाही लढाईमध्ये पराजय नाही
१९ व्या विसाव्या वर्षी पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घ्यायची आणि 20-21 वर्ष नुसते लढत राहायचे. ४१ लढाया एकाही लढाईमध्ये पराजय आला नाही आणि मुघल असो, निजाम असो, पोर्तुगीज असो सर्व प्रकारच्या शत्रूला नामोहरम करण्याचे काम हे थोरले बाजीराव यांनी केले, असेही पुढे फडणवीस म्हणाले.

मराठा साम्राजाचे विस्तार करण्याचे काम थोरल्या बाजीरावांनी केले
पश्चिमेमध्ये त्यांचा बोलबाला होताच, दक्षिणेमध्ये देखील साम्राज्याचा विस्तार झाला आणि अगदी उत्तरेला काबुलमध्ये, त्यानंतर बंगालपर्यंत सगळे पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा त्याकाळच्या अखंड भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची स्थापना किंवा त्याचा विस्तार करण्याचे काम हे थोरल्या बाजीरावांनी केले. त्यांच्यावर अतिशय कमी वयामध्ये शाहू महाराजांनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम हे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केलेलं आहे.

मराठा साम्राज्यातील काही नायकांनी अन्याय केला
दरम्यान, ब्रिटिश व काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील काही नायकांवर अन्याय केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. “इंग्रजांनी व काही प्रमाणात स्वकीयांनीही आमच्या इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा व मराठी साम्राज्याचा इतिहासच आपल्या इतिहासातून ‘डिलीट’ करून टाकला. त्यामुळे आपल्याला वाटले की मुगलांनंतर थेट इंग्रजच इथे आले आणि त्यांनी आपल्यावर राज्य केले. त्यामुळे आपल्या अनेक महानायकांचा विसर आपल्याला पडला”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...