Sunday, October 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या - CM...

Devendra Fadnavis : दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या – CM फडणवीस

नाशिक | Nashik

ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.०पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कामांसाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा, अभियान २०२६-२७ चा शुभारंभ तसेच ‘सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

- Advertisement -

यावेळी फडणवीस म्हणाले की, यंदा सुरुवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने दुष्काळ असलेल्या तालुक्यात १२ प्रकारच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. आगामी काळात दुष्काळी (Drought) परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik News : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात नाशिकचा डंका; जिल्हा परिषद, नाशिक पंचायत समिती राज्यात प्रथम

तसेच पिण्याच्या (Water) पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. माणसे आणि जनावरांसाठी पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देऊन रब्बी हंगामासाठी योग्य नियोजन करावे. गाव तलावांमधील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे आणि जलतारा संरचना मोठ्या प्रमाणात उभारणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. या कामांसाठी शासनाकडून (Government) आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

जी रामजी योजनेच्या माध्यमातून विविध योजनांचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील. यामुळे पाणीसाठा वाढण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांनी आपले पशुधन विकू नये, यासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याचे नियोजनही शासन करणार आहे. पशुधनाचे संरक्षण करणे हे शेतीव्यवस्था टिकविण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

संकटाच्या काळात शासन शेतकरी व कष्टकऱ्यांच्या पाठीशी

दुष्काळी परिस्थितीत कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही, याची काळजी शासन घेईल. पात्र शिधापत्रिकाधारकांना आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासह शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यात येतील. शेतकऱ्यांना मदत करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणे आणि संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ निवारण आणि दुष्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येणार आहे. तलावांतील गाळ काढणे, जलसंधारणाची कामे करणे आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी अभियानाच्या गुणांकन पद्धतीतही आवश्यक बाबींचा समावेश करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडलं – आदित्य ठाकरे

0
मुंबई ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्य विरोधात आंदोलन तीव्र होत असताना आज सायंकाळी दादर येथे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी...