Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: मंत्री, पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करावी, शेतकऱ्यांना मदतीचे पैसे...

CM Devendra Fadnavis: मंत्री, पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करावी, शेतकऱ्यांना मदतीचे पैसे कधी मिळणार?मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai
मराठवाडा, विदर्भात आलेल्या भीषण पूरस्थिती असतानाच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर
राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पूराचा फटका ३० जिल्ह्यांना बसला आहे. आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अतिवृष्टीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये पीक नुकसानीसाठी २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील तब्बल ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

- Advertisement -

राज्यात ८ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कुठे अतिवृष्टी झाली आहे, कुठे पूर आला आहे, कोणत्या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे, याबद्दलचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत, अनेक भागांत हेलिकॉप्टरद्वारे NDRF बचावकार्य करत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

YouTube video player

मंत्री, पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करावी
पुढच्या ८ ते १० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्री आणि पालकमंत्र्यांनी उद्यापासून पूरग्रस्त भागांची तातडीने पाहाणी करावी अशी सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सरसरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. तातडीने शेतकऱ्यांना मदत करणार असून मृत्यूच्या घटनांमध्ये मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर दिले आहेत. तर जनावरे आणि इतर नुकसान जे झाले आहे तेही जिल्हा स्तरावर मदत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री गिरीश महाजन तिकडेच आहेत. ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. तब्बल २२१५ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे.’

त्यांनी पुढे म्हटले की, आजच्या बैठकीत कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती याचा आतापर्यंत संपूर्ण आढावा घेतला. पंचनामे करण्याची प्रक्रिया आताही सुरू आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जात आहे. जेवढ्या पद्धतीची मदत करावी लागेल ती केली जात आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देखील मदत करण्यात येते.

मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, ‘शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकाद्याचा मृत्यू असेल, घरांचे नुकसान असेल, जनावरे दगावली असेल त्या कुटुंबाला मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मी देखील पूरग्रस्त भागात जाणार आहे. परिस्थिती समजून घेऊन आणखी मदत करता येईल का हे प्रयत्न सुरू आहेत. ओला दुष्काळचे जाऊ द्या याठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत नियमानुसार देता येईल ती देऊ. खरडू गेलेल्या जमिनीकरता आपल्याकडे जीआरआहे त्यानुसार मदत करता येईल.’

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या