नाशिक | Nashik
नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela 2027) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. फडणवीस काल (दि.२२) रोजी रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महापूजा देखील केली.
यावेळी महापूजा करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पिवळ्या रंगांचे सोवळं आणि उपरणे परिधान केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लुकची आता जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwar Temple) गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा करण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस महापूजा केल्यानंतर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwar) साधुग्रामची जागा, कुशावर्त कुंड यासह विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी फडणवीस यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, हिरामण खोसकर यांच्यासह भाजपचे (BJP) आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित आहेत.