Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली? CM शिंदे म्हणाले,...

पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली? CM शिंदे म्हणाले,…

दिल्ली । Delhi

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिल्लीत आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यानंतर ही भेट झाली. जवळपास एक तास मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंचे वडील संभाजी शिंदे, पत्नी, सून, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह ही भेट झाली.

- Advertisement -

या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना याविषयी माहिती दिली. पंतप्रधानांनी भेटीसाठी जास्त वेळ दिला होता. त्यासाठी त्यांचे आभार. चांगली चर्चा भेटीदरम्यान झाली, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. या भेटीत पंतप्रधानांना इर्शाळवाडी दरड दुर्घटना, राज्यातील पावसाची स्थिती, रखडलेले प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी पंतप्रधांनांनी रडखडेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन मोदींनी दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारावी प्रकल्पाची आवर्जुन आठवण काढली. हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प झाल्यास लोकांचं जीवनमान उंचावले. हा प्रकल्प लवकर व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुनर्वसनाचे प्रकल्प आणि एमएमआरडीएच्या प्रकल्पांना चालना देण्यावरही या भेटीत चर्चा झाली. आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं. चांगलं घर देणं सरकारचं काम असतं. त्यावरही चर्चा झाली. कोकणचं पाणी समुद्रात वाहून जातं. त्याचा उल्लेखही मी केला, असं सांगतानाच केंद्र सरकारकडून कोणत्याही विकास कामासाठी मदत दिली जाईल, असं आश्वासन मोदींनी दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या