Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहिण’नंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा मिळणार 'इतकी' रक्कम

‘लाडकी बहिण’नंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा मिळणार ‘इतकी’ रक्कम

पंढरपूर । Pandharpur

राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपुर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ (Ladaki Bahin Yojana) योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर राज्य भरातून भावांना काय मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यानंतर आता राज्य सरकारने राज्यातील भावांसाठीही नवी योजना आणली आहे.

- Advertisement -

लाडकी बहीण योजनेनंतर आता आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. तीन वेगवेगळ्या गटांमध्ये निधीची वर्गवारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा : नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान!

लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला ८ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला १० हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काय?

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना ०१ जुलै २०२४ पासून दर माह १५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड २) मतदार ओळखपत्र ३) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४) जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.

हे ही वाचा : “बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…”; मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Kunal Kamra : “हम होंगे कंगाल…”; कुणाल कामराची नवी पोस्ट, स्टुडिओतील...

0
मुंबई | Mumbai स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याने नवा वाद...