Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'लाडक्या बहिणीं'ना साद; म्हणाले, "योग्य संधी येईल तेव्हा सावत्र...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘लाडक्या बहिणीं’ना साद; म्हणाले, “योग्य संधी येईल तेव्हा सावत्र भावांना…”

पुणे | Pune

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यस्तरीय शुभारंभ आज पुण्यातील (Pune) बालेवाडी येथील मैदानातून करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेवर होणाऱ्या टीकेवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

- Advertisement -

हे देखील वाचा : “नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे कटकारस्थान करून…”; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, “आज हा लाडक्या बहि‍णींचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. मी लाडक्या बहि‍णींचे आभार मानतो, वंदन करतो. मी अनेक बहि‍णींच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू पाहिले. त्यांच्या डोळ्यात सरकारप्रती आदर पाहिले. महिलांच्या आयुष्यात सुखा-समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची इच्छा आहे. आम्हाला दुसरे काहीही नको. मी जिथे-जिथे जातो तिथे-तिथे मला लाडक्या बहिणी पैसे आल्याचे दाखवत आहेत”, असे त्यांनी म्हटले. तसेच आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो असून आम्ही अनेकांना पुरून उरलो आहोत. सावत्र, कपटी भावांवर मी मात करून इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे सावत्र भावांवर तु्म्ही विश्वास ठेवू नका. योग्य वेळी त्यांना जागा दाखवा. सावत्र भाऊ खोटे आरोप करत आहेत. लाडकी बहीण योजना कशी फसवी आहे, हा चुनावी जुमला आहे, असे विरोधक म्हणत आहेत. माझ्या बहिणींबद्दल असे बोलताना त्यांना जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे. ही योजना बंद व्हावी म्हणून ते न्यायालयात गेले. पण न्यायालयाने (Court) त्यांना चपराक दिली. न्यायालयाने बहिणींच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे योग्य संधी येईल तेव्हा सावत्र भावांना जोडा दाखवा”, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

हे देखील वाचा : मविआचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत किती वाढ करणार? राऊतांनी थेट आकडाच सांगितला

ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही, फटाफट फटाफट चालणारी योजना – फडणवीस

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथे होत आहे. आपले सरकार देना बँक सरकार असून याआधीच सरकार लेना बँक सरकार होते. मागच्या काळातील सरकार वसुली करणारे सरकार होते. आत्ताचे सरकार बहिणींना देणारे सरकार आहे. त्यामुळे आज आपण ठरवले पुण्यापासून सुरुवात करायची. पण पुण्यापासून जरी औपचारिक सुरुवात केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितले पैसे क्रेडिट करणे सुरू करा. आता एक कोटी तीन लाख महिलांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये प्रत्येकी जमा झाले आहेत, असेही त्यांनी म्हटले. त्याबरोबरच आता थोड्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचे बाकी आहे. त्यामुळे लवकरच त्या महिलांच्याही खात्यावर पैसे जमा होणार आहेत.प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे. ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. त्यामुळे आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत. ज्या बहिणींचे फॉर्म रखडले त्यांना तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकदम देणार आहोत, असे फडणवीसांनी सांगितले.

हे देखील वाचा : शरद पवारांचे राज्यातील तणावपूर्ण स्थितीवर मोठे विधान; म्हणाले, “ शांतता प्रस्थापित करायची असेल तर…”

पुढच्या पाच वर्षांत महिलांच्या खात्यावर ९० हजार रुपये जमा होणार – पवार

यावेळी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, राज्यभरातील महिलांसाठी सरकारने चार योजना आणल्या आहेत. सर्वांचा विचार करणारे हे सरकार आहे. सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की, येत्या काळात पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा होतील. तसेच तुम्ही आमच्या सरकारला पुन्हा संधी दिली तर पुढच्या पाच वर्षांत ९० हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होतील. हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत, हे पैसे कोणीच काढून घेणार नाही. त्यामुळे विरोधकांकडून पसरवलेल्या अफवांपासून दूर रहा.आतापर्यंत राज्यातील १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, असे त्यांनी म्हटले. तसेच विरोधी पक्ष काही नसताना टीका करत आहेत. विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिले असे म्हणतात, मात्र भावांकडेही आम्ही लक्ष दिले आहे. यापुढे कुणीही लाईट बिल भरू नये, कोण तुमची लाईट कट करायला येत तेच बघतो, हे भावासाठी केले आहे. काहीजण कोर्टात गेले, पण कोर्टात टिकले नाही. त्यानंतर ही योजना तात्पुर्ती आहे, असा प्रचार करायला लागले. पण मी सांगतो, अजून आमच्या सरकारचे पाच महिने आहेत, हे पाच महिन्याचे तुम्हाला साडे सात हजार तर मिळतीलच. परंतू हे सातत्य टीकवायचे, तर बहिणींनो हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही महायुतीला संधी, पाठबळ द्या,असे आवाहनही यावेळी अजित पवारांनी लाडक्या बहिणींना केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या