Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : "...अन् एका झटक्यात ऑनलाइनवाले लाईनवर आणले"; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना...

Eknath Shinde : “…अन् एका झटक्यात ऑनलाइनवाले लाईनवर आणले”; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

परभणी | Parbhani

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा उपक्रम असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज परभणीमध्ये पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी योजनाचा लाभ सर्वसामान्यांना कसा होत आहे हे सांगतांनाच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली…

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, सकाळी…

यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आमचे विरोधक तिकडे पाटण्यात एकत्र जमले आणि द्वेषाची, राजकारणाची खिचडी शिजवत होते. मात्र, त्यावर मला काही बोलायचे नाही, ज्यांना राजकारण करायचे त्यांना ते करू द्या, आपण काम करू देश चंद्रावर चालला आहे. पंरतु, जे गेली अडीच वर्ष घरात बसून ऑनलाईन कारभार करत होते. त्यांना आम्ही एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन थेट लाईनवर आणले आहे,” असे शिंदे यांनी म्हटले. तसेच “तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो,” असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

नाशकात खुनाचे सत्र सुरूच; किरकोळ वादातून युवकाची हत्या

पुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) देखील टोला लगावला. यावेळी ते म्हणाले की, “अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत झाले. त्यांच्या बाबतीत काहींनी गुगली टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते करू द्या. त्यांनाही अजित पवारांची भूमिका पटते आहे, असा चिमटा यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना काढला. तसेच जगात जर्मनी आणि भारतात परभणी असे म्हणतात, पण इथे काम करावे लागेल. रस्त्यांसाठी निधीची व्यवस्था केली जाईल, चकाचक रस्ते करू. तिजोरी आणि चावी दोघंही येथे आहेत, असेही शिंदे म्हणाले.

Fire Cracker Factory : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ३ जणांचा मृत्यू

ते पुढे बोलतांना म्हणाले की, ” काही जण मुख्यमंत्री बदलणार, सरकार पडणार म्हणत होते. अजितदादा आले आणि सरकार आणखी मजबूत झाले. आता म्हणतात मुख्यमंत्री बदलणार, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा जळफळाट होत आहे. आमच काय होणार याची भिती त्यांच्या मनात आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत शंभर कोटी रुपये गोरगरिबांच्या उपचारासाठी दिले. पण अडीच वर्षाच्या त्यांच्या काळात फक्त दोन ते अडीच कोटी निधी खर्च झाला म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर बोट ठेवले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

- Advertisment -

ताज्या बातम्या