Friday, May 17, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

नाशिकमध्ये महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

नाशिक | Nashik
नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही उमेदवार शहरातील बी डी भालेकर मैदान, शालीमार, नेहरु गार्डन, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालाय या परिसारातून भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांसह मंत्री गिरीष महाजन, मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आरपीआय नेते प्रकाश लोंढे, मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, मनसे उपाध्यक्ष सलिम मामा शेख तसेच मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, आमदार सरोज आहिरे विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सोनाली राजे पवार, सुरेश पाटील आदींसह महायुतीतील नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

- Advertisement -

नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून डॉ. भारती पवार हे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले काम हे काँग्रेसला करता आलेले नाही तसेच राज्यात सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय आणि राबवण्यात आलेल्या योजना याची पोच पावती नाशिककर आणि दिंडोरीकर देतील याचा विश्वास आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या