Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रBadlapur School Case : लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,...

Badlapur School Case : लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोपींना…”

मुंबई | Mumbai

बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. २० ऑगस्ट) सकाळपासून हजारो बदलापूरकर नागरिक (Citizen) रस्त्यावर उतरले आहेत. तसेच पालकांनी या शाळेबाहेर आंदोलन देखील सुरू केले. तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यानंतर आता या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालक रस्त्यावर उतरले

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, “मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो असून आरोपीला (Suspected) अटक (Arrested) करण्यात आली आहे. जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितले आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात देखील चालवला जाणार असून या प्रकरणात संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शिलेदार ठरला! कोअर कमिटीच्या बैठकीत ‘या’ नेत्याच्या नावावर एकमत

तसेच ” संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना त्याची पार्श्वभूमीवर तपासली पाहिजे. जर तसे झाले नसेल तर त्यांच्यावरही अत्यंत कठोर कारवाई करु. पोलीस, गृहविभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. या प्रकरणात कुणी पोलीस असतील जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Political Crisis : महायुतीतील राजकीय धुसफूस चव्हाट्यावर

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बदलापुरातील घटनेबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, “बदलापुरातील दुर्दैवी घटनेत २ तासांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यासाठी पोलिसांना सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. फास्टट्रॅक कोर्टात हा गुन्हा चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत”, असे त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...