Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रइर्शाळवाडीतील आधार गमावलेल्या मुलांसाठी मुख्यमंत्री सरसावले ; घेतला मोठा निर्णय

इर्शाळवाडीतील आधार गमावलेल्या मुलांसाठी मुख्यमंत्री सरसावले ; घेतला मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड (Irshalwadi Landslide) कोसळून झालेल्या दुर्घटननेनंतर येथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे सरसावले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अनेक मुलांनी त्यांचा आधार गमावला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनमार्फत (Dr. Shrikant Shinde Foundation) इर्शाळवाडीमधील मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे.

- Advertisement -

ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता असून त्यांना शोध घेण्याचे काम सुरु आहे.

“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”; आमदार अमोल मिटकरींचे सूचक ट्वीट

शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.

हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

..तर मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई होणार – मंत्री शंभूराज देसाई

दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे होणार पुनर्वसन

राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या