Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात लष्कर, नौदलाच्या तुकड्या सज्ज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती  

राज्यात लष्कर, नौदलाच्या तुकड्या सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती  

पूरपरिस्थितीत बचाव कार्याला वेग

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी (Heavy Rain) सुरू असून या परिस्थितीत जिल्हा, महापालिका प्रशासनासह एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा सज्ज असून या सर्वांना एकमेकांत समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (गुरुवारी) दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : पुण्यात पावसाचा हाहाकार; अनेकांच्या घरांत शिरलं पाणी, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या

राज्याच्या काही भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. त्यामुळे काळजीचे  कारण नाही. मात्र नागरिकांनी (Citizen) देखील आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : “माझ्याविरोधातील व्हिडीओ क्लिप जाहीर करा”; अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज

तसेच वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पुण्याला फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे. मुंबईत काही कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : राज ठाकरेंचा विधानसभेसाठी स्वबळाचा नारा; ‘इतक्या’ जागा लढवणार

शिंदे म्हणाले की, पुण्याला (Pune) संबंधित लष्कर आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तर तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले आहे. मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. मुंबईत २५५ पंप सुरु आहेत. मी मुंबई महापालिका आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हे देखील वाचा : Rain Update News : राज्यात पुढील चार दिवस ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार दमदार पाऊस

दरम्यान, मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवले आहे. पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फिल्डवर उतरून काम करीत आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या