Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्या'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, मुख्यमंत्र्यांची गणेशाचरणी प्रार्थना!

‘विघ्नहर्ता’ जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, मुख्यमंत्र्यांची गणेशाचरणी प्रार्थना!

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गणरायाच्या आगमनाने देशभरात भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विघ्नहर्त्यांची प्रतिष्ठापणा करण्यात आली. गणेशाची पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र समुद्ध व्हावा यासाठी गणरायाच्या चरणी साकडं घातलं असल्याची माहिती दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो. मी काल जम्मू-काश्मीरमध्ये होतो. श्रीनगरच्या लाल चौकात लोक गणेशोत्सव साजरा करत होते. ‘विघ्नहर्ता’ महाराष्ट्रातील जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील अशी मी प्रार्थना करतो. भक्तीभावाने आणि श्रद्धेने लोक आपापल्या घरामध्ये गणेशाची प्रतिष्ठापणा करतात आणि म्हणून आजचा दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे. विघ्नहर्त्याला सकाळी साकडं घातलं की, या महाराष्ट्रावरचं बळीराजावरचं शेतकऱ्यावरचं संकट दूर होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ दे अशी आमची भावना आहे. तसेच आमच्या प्रयत्नांना बळ विघ्नहर्ता, गणरायाने द्यावे अशी प्रार्थना केली. महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांच्या इच्छा आकांक्षा गणराया पूर्ण कर आणि या महाराष्ट्रावरची सगळी संकट दूर कर’ अशा प्रकारची मनोभावे प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.

आज पासून मोठ्या उत्साहात जल्लोषात गणपतीचं आगमन झालेलं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो.गेल्या वर्षी आम्ही गणपती उत्सव निर्बंध मुक्त केले आणि सर्व सणांवर बंधन होती ती सगळी दूर केली. निर्बंध मुक्त वातावरणामध्ये गेल्या वर्षी देखील गणेश भक्तांनी मोठ्या आनंदात उत्साहात गणपती उत्सव साजरा केला. याही वर्षी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. निर्देश दिलेले आहेत जे मंडळ वर्षानुवर्ष नियमानुसार गणपती उत्सव साजरा करतात त्याने यावर्षी सरसकट पाच वर्षाची गणपती बसवण्याची परवानगी द्यावी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही शुल्क आकारू नये. निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. कारण ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे. सण उत्सवामुळे सगळे लोक एकत्र येतात लोकमान्य टिळकांची भूमिका गणपती उत्सव शिवजयंती साजरा करण्याची ती सर्वांनी एकत्र आणण्यासाठी होती. आणि म्हणूनच सर्वांनी एकजुटीने एक दिलाने मनोभावे भक्ती भावे गणरायाची पूजा करावी. असा

- Advertisment -

ताज्या बातम्या