मुंबई | Mumbai
बदलापूर शहरातील (Badlapur City) एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी काल मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत पोलिस पुत्राचा निर्घृणपणे खून
तसेच बदलापूरमध्ये स्थानिकांनी आंदोलन (Agitation) करुन तब्बल आठ ते नऊ तास रेल रोको केला होता. त्यानंतर आता हे आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) विरोधकांवर केला आहे. यासोबतच चिमुरड्यांच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले? असा सवालही त्यांनी विचारला.
हे देखील वाचा : Nashik Sinnar News : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपी ताब्यात
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बदलापुरात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना दुर्दैवी आहे परंतु घटनेच्या निषेधार्थ झालेले आंदोलन राजकीय दृष्टीने प्रेरित होते. आंदोलनात स्थानिक लोक असायला हवे होते. तिथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होते. बाकी सगळे आंदोलक बाहेरचे होते. इतर ठिकाणांवरून गाड्या भरून लोक येत होते. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढूनही लोक ऐकायला तयार नव्हते. सरकारला बदनाम करण्यासाठी मंगळवारी बदलापूरमध्ये हे आंदोलन झाले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
हे देखील वाचा : बदलापूर प्रकरणातील आरोपीला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
त्यासोबतच राज्य सरकारने (State Government) सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ विरोधकांना उठला असल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, या राज्यातील बहिणींना सुरक्षा देण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. कुणालाही पाठिशी घालणार नाही. विरोधकांना सांगणे आहे की यावरून राजकारण करू नका. लाडकी बहीण योजना त्यांच्या जिव्हारी लागली आहे हे कालच्या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : गृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा; सुप्रिया सुळेंनी का केली विनंती?
बदलापूरच्या आंदोलनात बाहेरून गाड्या भरून लोक येत होते
जेव्हा कुठे आंदोलन होते तेव्हा तिथे स्थानिक लोक असतात. इथे स्थानिक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते. इतर ठिकाणांहून गाड्या भरुन भरुन आंदोलक आले होते. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागले असून ते यासंबंधी पुढील चौकशी करत आहेत. तब्बल ८-९ तास रेल्वे रोखणे हे देशाचे, रेल्वे संपत्तीचे नुकसान आहे. राजकारण करायला खूप गोष्टी आहेत, एका लहान बच्चूसोबत जे घडले त्याचे तुम्ही राजकारण करता, ज्याने केले त्याला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी आंदोलनाचे खापर विरोधकांवर फोडले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा