Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्र"तीन दिवसांच्या आत माफी मागा नाहीतर…"; मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस

“तीन दिवसांच्या आत माफी मागा नाहीतर…”; मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मानहानीची (Defamation) कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांच्या आत माध्यमांसमोर बिनशर्त माफी मागावी, असे या नोटीशीद्वारे सांगण्यात आले आहे. अन्यथा संजय राऊत आणि दैनिकाला फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे या नोटीशीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सामना या वृत्तपत्राच्या एका सदरात संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात किमान २५ ते ३० कोटी वाटल्याचा आरोप केला होता. तसेच अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही राऊतांनी त्यात लिहिले होते. त्यानंतर आता या आरोपांवरून मुख्यमंत्री शिंदेंनी राऊतांना नोटीस पाठवली आहे. तसेच संजय राऊत हे सध्या मुंबई बाहेर असल्याने त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून या नोटिशीला उत्तर दिले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नोटीस पाठविल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स (ट्वीट) या सोशल मीडिया अंकाऊटवर पोस्ट करत शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “५० खोके एकदम ओके. इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे. असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक अतिशय मनोरंजक आणि एक मजेदार राजकीय दस्तऐवज पाठवला आहे. आता मजा येईल!! जय महाराष्ट्र!,” असे संजय राऊत आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

नोटीशीत नेमकं काय म्हटलंय?

आपल्या सामना या वृत्तपत्राच्या २६ मे रोजीच्या सदरात एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचा बिनबुडाचा आणि धांदात खोटा आरोप केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांचे उमेदवार निवडून येऊ नयेत, यासाठीही खटाटोप केल्याचा आरोप सदरात होता. हा आरोपही बदनामीकारक आणि दिशाभूल करणारा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत एकही पैसा वितरित केलेला नाही. जर पैसे वाटल्याचा आरोप करायचा असेल तर त्यासंबंधीचे पुरावे सादर करा. फक्त मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशाप्रकारचा अपप्रचार केला जात आहे, असे या नोटिशीत म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या