Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना चाचण्यांसाठी फिरत्या प्रयोगशाळा

करोना चाचण्यांसाठी फिरत्या प्रयोगशाळा

मुंबई –

करोना चाचण्यांसाठी भविष्यात फिरत्या प्रयोगशाळा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

यांनी म्हटले आहे. एनएबीएल क्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅन चे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

या तीन व्हॅन्सच्या माध्यमातून मुंबईत दररोज 3 हजार करोना चाचण्या करता येतील. त्यांचा अहवाल 24 तासांत मिळेल आणि यासाठी फक्त 499 रुपये शुल्क आकारलं जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या