Saturday, November 16, 2024
Homeनगर‘मुख्यमंत्री युवा कार्य’साठी जिल्ह्यात 10 हजार 500 जागा

‘मुख्यमंत्री युवा कार्य’साठी जिल्ह्यात 10 हजार 500 जागा

980 शासकीय कार्यालयात 3 हजार 978 तर खासगी 106 कार्यालयात 6 हजार 440

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे रोजगार मिळवण्याची क्षमता तयार करण्यात येत आहे. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत सहा महिन्यांचा इंटर्नशिप कार्यक्रम देण्यात आला आहे. जिल्ह्यात 90 सरकारी कार्यालयात 3 हजार 978 तर 106 खासगी कंपनीत 6 हजार 440 जागांच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली होती. सध्या लाडकी बहीण योजनेचे अनुदान महिलांच्या खात्यावर जमा होत आहे.

- Advertisement -

तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 18 ते 35 वयोगटातील पात्र युवकांना सहा, आठ आणि दहा हजार प्रतिमहिना दिला जाणार आहे. योजना जाहीर होण्यापूर्वीच मागील तीन वर्षात जिल्ह्यातील 12 वी पास 6 हजार 443, आयटीआय आणि डिप्लोमा 3 हजार 731, पदवीधारक/पदव्युत्तर 8 हजार 945 अशा एकूण 19 हजार 119 तरुणांनी महास्वयम् पोर्टलवर रोजगारासाठी अर्ज केले होते. योजना जाहीर झाल्यापासून 3 हजार 756 जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत तसेच ऑफलाईन देखील अर्ज आले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 975 संस्थांनी नोंदणी केली आहे. यामध्ये केंद्र सरकर 20, राज्य सरकार 111 तर 844 खासगी संस्थांचा समावेश आहे. यातून बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्यांना सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळणार आहे.

1 हजार 818 थेट नियुक्ती
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे आतापर्यंत 1818 अर्जदारांना थेट नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये 1612 सरकारी कार्यालये तर 206 खासगी संस्थेतील नियुक्तीचा समावेश आहे.

शासकीय जागा
महापालिका 140, झेडपी शाळा 932, मंडलधिकारी कार्यालय 131, एमएसईबी 602, परिवहन 253, जिल्हा परिषद 150, साखर कारखाने 381, सहकारी संस्था 471 आणि आरोग्य संस्था 139.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या