Friday, May 3, 2024
Homeनाशिकओबीसींची खरी माहिती संकलित करा

ओबीसींची खरी माहिती संकलित करा

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

ओबीसीची जनगनणा (Census of OBCs) करतांना गावपातळीवर निर्माण करण्यात आलेल्या बीएलओंच्या (BLO) माध्यमातून ओबीसीची जनगनणा व्हावी, जेणेकरुन गावपातळीवर प्रत्येक घरी जावून बीएलओ ओबीसीचा खरा आकडा (True figure of BLO OBC) शासनापर्यंत पोहचवावे,

- Advertisement -

अशी मागणी करत संबंधित आयोगामार्फत इम्पेरिकल डेटा (Imperial data) सदोष पध्दतीने होत असल्याबाबतचे निवेदन (Memorandum) अखिल भारतीय समता परिषद दिंडोरी तालुक्याच्या (Akhil Bharatiya Samata Parishad Dindori Taluka) वतीने तहसीलदार पंकज पवार (Tehsildar Pankaj Pawar) व नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले (Nagar Panchayat Chief Nagesh Yeole) यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्देशीत केले नुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. सदर आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा (Imperial data) दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक (financial), सामाजिक (social), राजकीय (political) स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती. परंतू तसे न होता माहिती संकलित करतांना सॉफ्टवेअरद्वारे (Software) आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ही समस्त ओबीसी समाजाची (OBC community) फसवणूक असून सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील यांचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार असल्याचे मत निवेदनात नमुद केले आहे. समर्पित आयोगाद्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व तलाठी (talathi), ग्रामसेवक (gramsevak), अंगणवाडी सेविका (Anganwadi worker), आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत योग्य ती माहिती संकलित करून

शासनामार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या (Akhil Bharatiya Mahatma Phule Samata Parishad) वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशारा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. योेगेश गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, महिला तालुकाध्यक्षा संगीता राऊत,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तौसिफ मनियार, शहराध्यक्षा कविता पगार, नितीन देशमुख, दुर्गेश चितोडे, सोनू काठे, छबु मटाले, बापू चव्हाण, संतोष नवले, जगदिश सोनवणे, महेश तिवारी आदींनी दिला आहे.

ओबीसींची माहिती संकलित करतांना गावपातळीवरील बीएलओ, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत दारोदार जावून ओबीसींची खरी आकडेवारी शासनाने संकलित करुन सर्वोच्च न्यायालयाला सादर करुन ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरुन चुकीच्या पध्दतीला विरोध केल्याशिवाय राहणार नाही.

– डॉ. योगेश गोसावी, जिल्हाध्यक्ष समता परिषद

- Advertisment -

ताज्या बातम्या