Friday, July 5, 2024
HomeनाशिकNashik News : सिंहस्थ तयारीचा विभागनिहाय आढावा

Nashik News : सिंहस्थ तयारीचा विभागनिहाय आढावा

मंगळवारी सविस्तर अहवाल सादर करा; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर केल्या जाणार्‍या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पर्यटन विभाग, राज्य परिवहन महामंडळ, राज्य वीज पुरवठा विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्वतंत्र बैठक घेऊन, त्या विभागांच्या माध्यमातून केले जाणार्‍या नियोजनाचा आढावा काल जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी घेतला.

या बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी मागील कुंभमेळ्यापेक्षा आगामी काळातील कुंभमेळ्याला होणारी वाढीव गर्दी लक्षात घेता करावयाच्या नियोजनाचा आढावा सादर करण्याचे विविध विभागांना आवाहन केले.त्यासोबतच या आढाव्यात त्याकामांचे सविस्तर विवरण सादर करण्याची सूचना केली.त्यात सुचवण्यात आलेल्या विविध सुविधा, त्यांची कारण मीमासं, तांत्रिक स्पष्टीकरण या सविस्तर बाबींचा समावेश असावा असेही सूचित केले. या सर्व बांबीसह येत्या मंगळवारी आढावा सादर करण्याचे निर्देश या अधिकार्‍यांना दिले.

हे देखील वाचा : Vegetables Rate : भाजीपाल्याची आवक घटली; दर वाढले

राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने मागिल सिंहस्थात मिळालेल्या ३० कोटी रुपयांचा निधी वाढवून या आराखड्यात ३०४ कोटी रुपयांचा निधी मागणी पत्र सादर केले. यात विविध ठिकाणी सबस्टेशन डीपींची दुरुस्ती, नवीन वाहिन्या उभारणे, विद्युत तारा आणि नवीन वीज वाहिन्यांचा समावेश होता.यासोबतच राज्य परिवहन महामंडळाच्या विकासकामांसाठी मागील सिंहस्थमध्ये १० कोटी रुपये निधी देण्यात आला होता. यावर्षी त्यांना सोबतीला सिटी लिंक सेवा असल्यामुळे त्यांची आवश्यक बाबींची पूर्तता नवीन गाड्या हव्या आहेत का? भाडेतत्त्वावर घेणे सोयीचे आहे काय? अशा विविध प्रश्नांवर सविस्तर माहिती संकलित करण्याचे आवाहन केले.पर्यायी उपाय योजनांवरही विचार करण्याचे सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून प्रदुषण नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना, भाविकांच्या (Devotees) स्नानानंतर कुंडातील पाणी स्वच्छतेबाबतच्या उपाययोजनांचे नियोजन, पाण्याचे निर्जंतुकीकरण कसे केले जाईल, प्रदूषण वाढण्याच्या संभावना किती आहे? रात्रभर वीज पुरवठा सुरू राहण्याने प्रदूषणात किती वाढ होईल? अथवा त्याचे दुष्परिणाम काय होतील? याबाबत सविस्तर अहवाल मंगळवारी सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.यासोबतच विविध विभागांनी आपल्या विकासयोजनेत आवश्यक व अडचणीच्या ठरणार्‍या गोष्टींवर जिल्हाधिकारी कार्यालयातून (Collector Office) उपायोजना व मदत केली जाईल.तसेच जागेचा प्रश्न देखील सोडविला जाईल असेही आश्वासित केले. याबैठकीचे नियोजन नायब तहसीलदार मोराणकर यांनी केले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇

- Advertisment -

ताज्या बातम्या