Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या‘घरोघरी तिरंगा’अभियानात सहभागी व्हावे

‘घरोघरी तिरंगा’अभियानात सहभागी व्हावे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गतवर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, दुकाने, आस्थापनांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

- Advertisement -

शर्मा म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता समारोप कार्यक्रमानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबवण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत सर्वांनी या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवावा.

नागरिकांना ध्वज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच ज्या संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना अधिक प्रमाणात तिरंगा ध्वज हवे असल्यास त्यांनी आपली मागणी आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयात नोंदवावी.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

घरोघरी तिरंगा उपक्रम राबवताना प्रत्येक नागरिकाने ध्वजसंहितेचे पालन करावे, तिरंगा ध्वज फडकवताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.

तिरंगा झेंडा उतरवताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. घरोघरी तिरंगा हा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत फडकलेला असेल, दररोज सायंकाळी उतरवण्याची आवश्यकता नाही. मात्र कार्यालयांनी ध्वजसंहिता पाळावी. या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे. अभियान कालावधीनंतर झेंडा सन्मानाने जतन करून ठेवावा, अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने घरोघरी तिरंगा अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या