Tuesday, March 25, 2025
Homeनगरनिवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करा

निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रीया पारदर्शक राहील याकडेही लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिले. विधानसभा निवडणुकीबाबत दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, संपूर्ण निवडणुक कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी यादृष्टीने पोलीस अधिकार्‍यांशी समन्वय ठेवावा. निवडणूक विषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यात कुणालाही सूट देवू नये, कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवावे. आनंददायी मतदान केंद्र असावे अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असल्याने त्यादृष्टीने मतदारांसाठी किमान सुविधा कराव्यात, मनुष्यबळ आणि ईव्हीएम यंत्राच्या दुसर्‍या सरमिसळचे नियोजन करावे.

12 आणि 13 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावरील कर्मचार्‍यांचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करावे, तसेच मतमोजणी कर्मचार्‍यांसाठीही प्रशिक्षण आयोजित करावे. मतदान कर्मचार्‍यांच्या सुविधेबाबतही नियोजन करावे. मतदानाच्यावेळी वेबकास्टींगची सुविधा करण्यासाठी आतापासून नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. महाजन यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. यावेळी टपाली मदतान प्रक्रीयेबाबत आढावा घेण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...