Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमCrime News : कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

Crime News : कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

चास (ता. अहिल्यानगर) शिवारातील आडसुळ कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्रशांत दत्तात्रय जाधव (वय 19, रा. सारंगवस्ती, निमगाव वाघा, ता. अहिल्यानगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जखमी प्रशांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. साहिल शेवाळे (रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) व त्याच्या सोबतच्या अनोळखी दोन मित्रांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

प्रशांत जाधव हा आपल्या मित्रासोबत महाविद्यालयाच्या पटांगणात बोलत जात होता. त्यावेळी संशयित आरोपी साहिल शेवाळे याने तिथे येत तू मला शिवी का दिली असे म्हणत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. फिर्यादीने वाद टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्याला हॉटेलवर येण्याची धमकी दिली. यानंतर प्रशांत हा महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये डबा आणण्यासाठी गेला असता, साहिल शेवाळे आणि त्याचे दोन अनोळखी मित्र तिथे आले. तुला भांडण करायचे आहे का? असे विचारत त्यांनी वाद उकरून काढला.

YouTube video player

यावेळी साहिलच्या एका साथीदाराने कमरेला लावलेला चाकू काढून प्रशांतवर वार केला. तसेच साहिल आणि त्याच्या दुसर्‍या मित्राने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी प्रशांत जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार जंबे करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : वकिलांचे न्यायाधीशांवर आक्षेप! कामकाजापासून राहिले अलिप्त

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक वकील संघाने (Nashik Lawyers Association) जिल्हा न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या मनमानीसह कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सोमवारी (दि. २) एकदिवसीय कामबंद आंदोलन...