धुळे Dhule । प्रतिनिधी
जिंकायचे असेल (Want to win) तर स्वतः देशासाठी शहिद न होता, (Without being a martyr himself,) शत्रु सैन्याला (enemy army) त्यांच्या देशासाठी शहिद करा, (Martyr for their country,) असे युध्दाच्या प्रसंगी (case of war) सैनिकांना प्रोत्साहित (Encouraging soldiers) केले जाते. भारतीय सैन्यदलात (Indian Army) अधिकारी होण्यासाठी खडतर प्रशिक्षण (Hard training) घेण्याबरोबरच आपल्यात नेतृत्वगुण व अनुशासनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कर्नल यु. डब्लु. पाटील (Colonel U. W. Patil) यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने कबचौमवि, जळगांव संचलित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र, धुळे व विद्यार्थी विकास विभाग, कबचौउमवि जळगाव यांचे संयुक्त विद्यमान विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी करीता एक दिवसीय सैन्यदल भरती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्रात करण्यात आले होते. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात सैन्यदल अधिकारी होण्यासाठी पूर्व तयारी या विषयावर मार्गदर्शन करतांना कर्नल पाटील बोलत होते.
यावेळी कर्नल पाटील यांनी आपल्या देशाकडून विविध युध्दामध्ये व मोहिमामध्ये पराक्रम गाजविणारे भारतातील 22 परमवीर चक्र मिळवणारे आपले खरे हिरो आहेत. जिंकायचे असेल तर स्वतः देशासाठी शहिद न होता, शत्रु सैन्याला त्यांच्या देशासाठी शहिद करा, असे युध्दाच्या प्रसंगी सैनिकांना प्रोत्साहित केले जाते.
कार्यशाळेचे उद्घाटक महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र प्रमुख प्राचार्य डॉ.पी.एच.पवार म्हणाले की, आपल्या जीवनाचा उद्देश लहान असेल तर तो गुन्हा आहे. शिक्षण घेतांना आपण आपले ध्येय निश्चित करावे असेही ते म्हणाले.
प्रा. डॉ. पी. के. पाटील यांनी महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र स्थापनेच्या इतिहास व केंद्रामार्फत गांधी विचाराचा प्रचार व प्रसारासाठी राबविले जात असलेले उपक्रम व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित कार्यशाळेच्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश विषद केला.
कार्यशाळेच्या दुसर्या सत्रात बी.एस.एफचे सेवानिवृत्त सैनिक मुकेश पाटील यांनी सैन्य भरती करीता मैदानी पुर्व तयारी या विषयावर मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या. तसेच स्वतःचा आत्मविश्वास कधीही कमी होवू देवू नका. तुम्ही जे करू शकता ते कोणीही करू शकत नाही, असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
तिसर्या सत्रात लेप्टनंट प्रा. क्रांती पाटील यांनी आरोग्य आणि शरीर स्वास्थ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार व नियमित व्यायाम करणे हीच खरी गुंतवणूक आहे. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांकडून स्वस्थ आणि सशक्त भारतासाठी शपथ म्हणून घेतली.
शेवटच्या सत्रात सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनिल सुर्यवंशी यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की, तुम्हाला सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात नोकरीच्या अधिक संधी आहेत आणि त्यात यशस्वी होणेसाठी चिकाटी व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. समारोप प्रसंगी दर्शन गर्दे, चेतन पाटील, वैभव बोराळे, प्रदिप राठोड व नेहा पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी केंद्राचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. पी. के. पाटील यांनी केंद्राच्या विनंतीस मान देवून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले.
कार्यशाळाच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन प्रा.के. जी. बोरसे, कॅप्टन प्रा.डॉ. के. एम. बोरसे, कॅप्टन प्रा.डॉ. महेंद्रकुमार वाढे, लेप्टनंट प्रा. डॉ.शशीकांत खलाणे तसेच केंद्राचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.