Friday, May 3, 2024
Homeनाशिकबुद्धविहारांच्या राष्ट्रीय अधिवेशनास प्रारंभ

बुद्धविहारांच्या राष्ट्रीय अधिवेशनास प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बुद्ध विहार समन्वय समितीतर्फे (Buddha Vihar Coordinating Committee) आयोजित अखिल भारतीय बुद्धविहाराच्या (All India Buddha Vihara) पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनास (National Convention) आज सकाळी धम्म ध्वजारोहण (Dhamma flag hoisting) तथा भिक्खु संघास मानवंदना (Bhikkhu Sanghas Manavandana) देऊन कार्यक्रमास सुरवात झाली.

- Advertisement -

सकाळी आठला भंन्ते विनय बोधी प्रीय (Bhante Vinay Bodhi priya) यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण तथा धम्म ध्वज गाथेने कार्यक्रमास प्रांरभ झाला. याप्रसंगी समता सैनिक दलाने (Samata Sainik Dal) भिक्खू संघास गुणवंत वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली मानवंदना दिली. याप्रसंगी संम्मेलनाचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती बोधी, स्वागताध्यक्ष नंदकिशोर साळवे, मुख्य संयोजक प्रा. ऊमेश पठारे, मुख्य आयोजक अ‍ॅड. प्रदिप गोसावी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर अत्यंत सुरेख पद्धतीने उभारण्यात आलेल्या धम्मपिठावर सर्व भंन्तेंचे आगमन होऊन प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात भंन्ते विनयबोधी प्रीय व भन्ते सिलरक्षित यांच्या हस्ते झाली. भिक्खु संघास संघास त्रिशरण पंचशील याचना झाल्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. दुपारच्या उद्घाटकीय सत्राच्या अध्यक्षस्थानी भिक्खू विनय बोधीप्रीय तर स्वागताध्यक्ष आचार्य नंदकिशोर साळवे होते. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटक दिल्लीस्थित आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार पुन्हा सुधीरराज सिंग (Senior journalist Sudhirraj Singh) होते.

सुधीरराज यांनी आपल्या भाषणात नाशिकच्या (nashik) बौद्ध लेण्यांचा उल्लेख करून नाशिकमध्ये बौध्द लेणी (Buddhist caves) निर्माण होण्याचे कारण नाशिकला मोठ्या प्रमाणावर बौद्ध संस्कृती (Buddhist culture) अस्तित्वात होती, अन्यथा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लेणी खोदली जाणे अशक्य होते, असे सांगितले. अंधश्रद्धेवर टीका केली. शनिवार हा श्रमण संघींचा भेटण्याचा दिवस होता. आम्ही श्रमण संघी आहोत असे देखील सांगितले.

याप्रसंगी विक्खू विनय बोधीप्रीय, मुख्य संयोजक अशोक सरस्वती, डॉ. भीमराव गोटे आदींची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी उत्कृष्ठ काम करणार्‍या लोकांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यात लेण्यांच्या संदर्भातील विशेष कार्य करणारे पुणे येथील सागर कांबळे, आंबेडकरी आंदोलनातील प्रचार पत्रकार सुधीर राजसिंह, अभयरतन बौद्ध (दिल्ली), प्रो.आशाताई थोरात(अमरावती) गजानन पडगल(पुणे) अण्णासाहेब बनसोडे, उमेश पठारे, हर्षवर्धन पठारे(नाशिक), श्रीकांत नंदागवळी (नागपूर), माधवराव चिंचखेडे,

अ‍ॅड. उत्तमराव शेंडे(नागपूर), प्रा. डॉ भीमराव गोटे, अनिरुद्ध फुलमाळी, प्रा. घनःश्याम धाबार्डे, शुद्धोधन बडवणे, आर शामकुंवर, ए.के. पाटील, वामन पाटील, यशवंत वासनिक, दिलीप बागडे, मेहराताई गायकवाड, तनुजाताई झिलपे, प्रमिलाताई सोनवणे, सुधीर चालखुरे (नागपूर), उत्तम मेश्राम, रवींद्र जनबंधू आदींचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अधिवेशनासाठी विशेषरुपाने तयार करण्यात आलेल्या ‘धम्मनिकाय’ स्मरणिकेचे प्रकाशनही विचारमंचावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दुपारच्या पहिल्या सत्रात ‘पाली भाषा प्रचार-प्रसारामध्ये बुद्ध विहार समन्वय समितीची भूमिका’ या विषयावर राजेंद्र भालशंकर यांनी विचार मांडले. ते म्हणाले की, पाली भाषा ही शाळेतील अध्यापनाचा विषय व्हावी, बौद्ध बांधवांनी पाली भाषा शिकून याचभाषेत बोलण्याचा प्रयत्न करावा, त्रिपिटकांचे भाषांतर राज्य भाषांमध्ये व्हावे, आदी मागण्या केल्या. तर या सत्रातील दुसरे वक्ते रमेशभाई बंकर यांनी प्राचीन पाली भाषेचे महत्त्व सांगताना या भाषेत जगाचे ज्ञान भांडार असल्याच ते म्हणाले. तसेच पाली भाषा संविधानाच्या आठव्या सूचित आणावी अशी मागणीही त्यांनी केली.

सत्राच्या अध्यक्षस्थानी नंदकिशोर साळवे होते. त्यांनीही पाली भाषेचा प्रचार-प्रसार होण्यासाठी अधिकाधिक लोकांना पाली भाषा शिकण्याचे आवाहन केले. सत्राचे सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. कविता भालेराव यांनी केले.सायंकाळच्या सत्रात उपस्थितांना भिक्खूवृंदाने धम्मदेसना दिली. तसेच अशोक सरस्वती बोधी यांचा ‘आंबेडकरी कीर्तनाचा’ कार्यक्रम झाला. आजच्या संपूर्ण सत्राच्या यशस्वीतेसाठी उमेश पठारे, दीपक गोसावी, कॅप्टन कुणाल गायकवाड, राजेश गांगुर्डे, भरत तेजाळे, सचिन तेजाळे, प्रा. मंगेश गांगुर्डे, श्यामकांत मोरे, हेमंत केळकर, प्रा प्रकाश दोंदे, जयश्री खरे, वैशाली जाधव, बाळासाहेब जाधव, किशोर शिंदे, प्रयत्न केले.

उत्तम नियोजन व सजावट

श्रीकृष्ण लॉन्स येथे या दोन दिवसीय संमेलनासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात सजावट केली असून प्रवेशद्वारांना संत गाडगेबाबा (Saint Gadge Baba), कर्मयोगिनी शांताबाई दाणी, बाबुराव बागुल ‘प्रवेशद्वार’ तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड (Karmaveer Dadasaheb Gaikwad) ‘धम्मपीठ’ अशी नावे देण्यात आली आहेत.

धम्मपीठावर नाशिकच्या बौध्द लेणींमधील सुप्रसिध्द गुफाचित्राचा वापर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे श्रीकृष्ण लॉन्सच्या या जागेत ज्या झाडाखाली संत गाडगेबाबा नाशिकला आल्यावर बसत असत त्याच जागेवर गाडगे महाराजांची प्रतिमा आणि फुलांनी सजावट करण्यात आली असून भगवान गौतम बुद्धांची (Lord Gautam Buddha) भव्य मूर्ती ठेवून पाण्याचे कारंजे रांगोळ्यांचे डेकोरेशन करण्यात आले आहे. सकाळच्या पहील्या सत्राचे सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या