Wednesday, July 24, 2024
Homeजळगावआर्थिक विवंचनेतुन बाप लेकाची विष घेऊन आत्महत्या

आर्थिक विवंचनेतुन बाप लेकाची विष घेऊन आत्महत्या

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

- Advertisement -

पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू त्यातच पैसा लागत असल्याने डॉक्टरांकडून पैशाची मागणी होत असल्याने या आर्थीक विवंचनेतुन शहरातील आदर्शनगर परिसरातील दीपक रतीलाल सोनार (वय ६५) व त्यांचा मुलगा परेश दीपक सोनार (वय ३४) पिता-पुत्राने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची आज सायंकाळी उघडकीस आली. असून यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील आदर्श नगरात दीपक रतीलाल सोनार (वय ६५) हे पत्नी श्रद्धा आणि मुलगा परेश यांच्या सोबत वास्तव्यास आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून श्रद्धा यांच्या वर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज त्यांची मुलगी रुपाली व जावई मुकेश हे त्यांना बघण्यासाठी आले होते. दरम्यान हॉस्पिटलने दोन दिवसाचे बिल दीड लाख रुपये काढले होते.

परंतु सोनार यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचे बिल जावई मुकेश यांनी भरले. त्यानंतर ते श्रद्धा यांना पुढील उपचारासाठी दुसरीकडे घेऊन जात होते.

मात्र रूग्णालयाने त्यांना दुसरीकडे न जाता याच ठिकाणी उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जावई व मुलीने वडीलांना घरी जाऊन आराम करा असे सांगितले.

घरातील कमवता अत्यावस्थ असल्याने घेतला टोकाचा निर्णय

पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे दोन दिवसात त्यांनी २ लाख रुपये रोख कॅश भरली होती. प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे पुन्हा त्यांना रुग्णालयाने 5 लाख रुपये भरण्यासाठी सांगितले होते.

परंतु सोनार यांच्या कुटुंबात श्रद्धा याच सोनारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. घरातील कमावती महिला च ऍडमिट आहे त्यातच त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

या आर्थिक विवंचनेतून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असल्याने नातेवाईकांकडून बोलले जात आहे.

फोन उचलत नसल्याने उघडकीस आली घटना

आज दुपारी दीपक सोनार यांची मुलगी व जावई त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी उपचार सुरू असणार्‍या आईची विचारपूस केली. यानंतर त्यांनी घरी गेलेल्या आपल्या वडिलांना फोन लावला परंतु ते फोन उचलत नव्हते.

दरम्यान सायंकाळी मुलगी पुन्हा घरी आली असता दीपक रतीलाल सोनार (वय ६५) व त्यांचा मुलगा परेश दीपक सोनार (वय ३४) यांचे मृतदेह त्यांना आढळून आले.

त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात आणले असता विष प्राशन केल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच रामानंदपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सतीश डोलारे, रवी पाटील, शिवाजी धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. रात्री उशिरा सीएमओ डॉ. अहिरे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या