Friday, April 25, 2025
Homeनगरकंपनीवर बुलडोझर चालवून गेट, कॅबीनची तोडफोड

कंपनीवर बुलडोझर चालवून गेट, कॅबीनची तोडफोड

ताबा मारण्याचा प्रयत्न || मुंबईच्या व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील एमआयडीसीतील एका कंपनीवर बुलडोझर चालवून गेट व सेक्युरीटी कॅबीन तोडून ताबा मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची घटना 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली असून याप्रकरणी 10 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्यावसायिक अर्चना संजय पुगालिया (वय 49 रा. अरिहंत शांतीविहार सोसायटी, सारसनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश मलय्या शेरेगर (रा. 110 बी तेजपाल इस्टेट, अंधेरी कुर्ला साकीनाका, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

फिर्यादी यांच्या मालकीची नागापूर एमआयडीसीतील प्लॉट बी 90 व बी 52 येथे कंपनी आहे. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास प्रकाश मलय्या शेरेगर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांचा कायदेशीर ताबा असलेल्या प्लॉटवर कोणतीही परवानगी न घेता बेकारयदेशीरपणे बुलडोझर चालविला. त्याच्या सहाय्याने कंपनीच्या गेटचे व सेक्युरीटी कॅबीन तोडून नुकसान केले. फिर्यादी व कंपनीतील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. प्लॉटचा ताबा घेण्याकरीता धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, सदरचा प्रकार 29 ऑगस्ट रोजी घडला असून गुन्हा 10 डिसेंबर रोजी दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...