Friday, November 22, 2024
Homeनगरमागील वर्षीच्या तुलनेत यंदा रोहयोवर दुप्पट मजूर

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रोहयोवर दुप्पट मजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुष्काळी परिस्थिती असल्याने यंदा रोजगार हमीवरील मजूरांची संख्या दुप्पटीने टिकून आहे. मागील वर्षी याच कालावधीत मे महिन्यांत जिल्ह्यात 8 हजार 989 मजूर रोहयोवर होते. यंदा हा आकडा 17 हजार 146 झाला असून वाढलेले उन्ह आणि लोकसभा निवडणुकीचा कोणताच परिणाम रोहयोच्या कामांवर दिसत नसून पोटासाठी ग्रामीण भागात मजूरांची रोजगार हमीलाच पंसती असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि महसूल यंत्रणेची 1 हजार 971 कामे सुरू असून त्याठिकाणी 17 हजार 146 मजूरांची उपस्थिती आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात मागील पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे ऑगस्ट 2023 ला राज्य शासनाने नगर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली होती. खरीप हंगाम पावसाने ताण दिल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराश पडली. यामुळे प्रशासनाने मध्यम हंगाम खरीप हंगाम पिका विम्याची 25 टक्के रक्कम अग्रमी देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले. त्यानंतर परतीचा पाऊस होवून रब्बी हंगामात पिके साधतील अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र, परतीच्या पावसाने हात दाखवल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराश पडली. रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी नसल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागात शेतीचा विषय संपल्याने शेत मजूरांना रोहयोशिवाय रोजगाराचा पर्याय नसल्याचे चित्र आहे.

यामुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात उन्हाचा कडाका वाढत असतांना पारा 40 अशांच्या पुढे असतांना शाश्वत रोजगारासाठी मजूरांची रोहयोला पहिली पंसती असल्याचे दिसत आहे. यामुळे आजही ग्रामीण भागाम रोहयोवरील मजूरांची संख्या टीकून आहे. जिल्ह्यात सध्या रोहयोतून घरकुल, सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, गुरांचे गोठे, रोपवाटिका, वृक्ष संगोपन यासह व्यक्तीगत लाभाच्या अनेेक योजना, शौचालय आदींचीकामे सुरू आहेत. रोहयोअंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर मजुरांकडून कामांची मागणी प्राप्त होताच तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत.

तालुकास्तरावरील संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बैठका घेऊन रोहयो कामांची गती वाढविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मजूरांची संख्या जामखेड तालुक्यात 8 हजार 800 असून त्यानंतर शेवगाव तालुक्यात 2 हजार 583 असून पारनेरमध्ये 1 हजार 92 आणि संगमनेर तालुक्यात 1 हजार 76 आहे. तर सर्वात कमी मजूर श्रीरामपूर तालुक्यात अवघे 84 असून राहाता तालुका 154, कोपरगाव तालुक्यात 189 असून नेवासा तालुक्यात 383 आहेत.

तालुकानिहायक कामे कंसात मजूर –
अकोले 381 मजूर-212 कामे, जामखेड 8 हजार 800 मजूर-742 कामे, कर्जत 454 मजूर-62 कामे, कोपरगाव 189 मजूर-65 कामे, नगर 383 मजूर-55 कामे, नेवासा 165 मजूर- 35 कामे, पारनेर 1 हजार 92 मजूर-74 कामे, पाथर्डी 894 मजूर- 107 कामे, राहाता 154 मजूर- 49 कामे, राहुरी 223 मजूर- 58 कामे, संगमनेर 1 हजार 76- 203 कामे, शेवगाव 2 हजार 583- 257 मजूर, श्रीगोंदा 668 मजूर- 117 कामे, श्रीरामपूर 84 मजूर- 26 कामे असे आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या